इंटेट अकॅडमीत विद्यार्थी पालक मेळावा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंटेट अकॅडमीत विद्यार्थी पालक मेळावा उत्साहात
इंटेट अकॅडमीत विद्यार्थी पालक मेळावा उत्साहात

इंटेट अकॅडमीत विद्यार्थी पालक मेळावा उत्साहात

sakal_logo
By

44851
गडहिंग्लज : ‘इंटेट’मधील विद्यार्थी-पालक मेळाव्यात बोलताना प्रा. सत्यनारायण राव. शेजारी एम. एल. चौगुले, महेश मजती, संदीप कागवाडे, मीना रिंगणे, मनोहर गुरबे आदी.

इंटेट ॲकॅडमीत विद्यार्थी
पालक मेळावा उत्साहात
गडहिंग्लज, ता. २३ : विद्यार्थ्यांनी यशप्राप्तीसाठी वेळेचे, अभ्यासाचे नियोजन करण्यासह पोषक वातावरणनिर्मिती व आकलनक्षमताही वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी इंटेट करिअर ॲकॅडमीत विद्यार्थ्यांना संस्कार, योगासन, चिंतनाचे प्रशिक्षणही आयोजित करण्यात येईल, असे प्रतिपादन ‘इंटेट’चे संचालक एम. एल. चौगुले यांनी केले.
येथील इंटेट करिअर ॲकॅडमीच्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थी, पालक मेळाव्यात ते बोलत होते. समन्वयक प्रा. सत्यनारायण राव यांनी ‘जेईई-नीट’ अभ्यासक्रम, वेळापत्रक, टेस्ट व त्यातील विद्यार्थ्यांची प्रगती यावर मार्गदर्शन केले. अकरावी-बारावी विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या बाबतीत अडथळे येत असून, ते दूर करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालकांची जबाबदारी महत्त्वाची असल्याची चर्चा मेळाव्यात झाली. चर्चेत डॉ. चंद्रकांत पाटील, प्रा. डॉ. सीमा साखरे, सुनील कुंभार, दशरथ पाटील, मारुती शिंदे, संजय मुरुकटे, दत्तात्रय गणाचारी आदींनी सहभाग घेतला. मेळाव्यात प्रा. डॉ. सीमा साखरे व डॉ. चंद्रकांत पाटील यांची पालक प्रतिनिधी म्हणून निवड झाली. प्राचार्य मनोहर गुरबे यांनी स्वागत केले. डॉ. दत्ता पाटील, मीना रिंगणे, महेश मजती, संदीप कागवाडे, शंकर देसाई, भरतसिंह गौड, रोहन आष्टेकर, श्रीनैया अनंतुला, कृतिका शेट्टी, मिताली कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89590 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..