सिंहासन, लटकन माळांची चलती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहासन, लटकन माळांची चलती!
सिंहासन, लटकन माळांची चलती!

सिंहासन, लटकन माळांची चलती!

sakal_logo
By

येई गणेशा...
45088
गडहिंग्लज : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाप्पाला सजविण्यासाठीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली असून, विविध प्रकारच्या माळांचे निरीक्षण करताना एक ग्राहक. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

सिंहासन, लटकन माळांची चलती!
गडहिंग्लज बाजारपेठ सजली; बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारात किमती साहित्य
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २३ : गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्याच्या स्वागतासाठी आबालवृद्ध उत्सुक असून, बाजारपेठही सज्ज झाली आहे. बाप्पांना सजविणे व मूर्तीसमोर आराससाठी आवश्यक ते सर्व साहित्यांचे स्टॉल उभारले आहेत. बाप्पांसाठी सिंहासन अन् लटकन माळांची चलती सुरू असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विविध प्रकारचे सजावटीचे किमती साहित्यही बाजारात दाखल झाले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर घरोघरी स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. आबालवृद्धांचे हात या कामात गुंतले आहेत. रंगरंगोटीही सुरू झाली आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी वातावरण उत्साही बनले असून, यंदाच्या निर्बंधमुक्त उत्सवामुळे उत्साहात भर पडली आहे. बाप्पाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या आबालवृद्धांकडून आतापासूनच खरेदीचा उत्साह वाढत आहे.
गडहिंग्लज बाजारपेठेत बाप्पाला सजविण्यासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे साहित्य दाखल झाले आहे. उत्सवाला आठ दिवस असतानाच साहित्यांचे स्टॉल उभारले आहेत. विशेष करून अनेक प्रकारच्या माळांनी बाजारपेठ सजली आहे. लटकन माळा २५ ते ३०० रुपयापर्यंत उपलब्ध असून, त्याची चलती सुरू आहे. बाप्पाला विराजमान होण्यासाठी खास आकर्षक थर्माकोलची सिंहासने बाजारात दाखल झाली असून, त्याची किमत ४०० रुपयांपासून नऊ हजारापर्यंत आहे. याशिवाय आकर्षक मोत्यांच्या माळा ६० ते १५० रुपये, साध्या माळा ४० ते २५० रुपये, पडदे १८० ते १९०० रुपयापर्यंत आहेत. विविध प्रकारच्या सुवासिक अगरबत्ती उपलब्ध आहेत. बाप्पांसमोर रोषणाईसाठी अनेक प्रकारच्या लायटिंग माळांची रेलचेल बाजारात आहे. त्याच्या किमती शंभर ते सहाशे रुपयापर्यंत आहेत.
बाप्पासमोर आरास करण्यासाठी आकर्षक कागदी आणि रंगीबेरंगी माळा आल्या आहेत. सार्वजनिक मंडळांसह घरगुती बाप्पाला सजवण्यासाठी सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध झाले असून, खरेदीसाठीही नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. विविध प्रकारचे फटाकेही बाजारात दाखल झाले आहेत.

चौकट...
कोरोनानंतरचा उत्साह
कोरोनामुळे दोन वर्षे सण, उत्सवावर निर्बंध होते. यामुळे बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झाल्याने निरुत्साहाचे वातावरण होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने शासनाने सण, उत्सवावरील निर्बंध हटविले आहेत. परिणामी बाजारपेठेत खरेदीसाठीचा उत्साह वाढत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89599 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..