पथविक्रेता समिती आता ‘इलेक्टेड’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथविक्रेता समिती आता ‘इलेक्टेड’
पथविक्रेता समिती आता ‘इलेक्टेड’

पथविक्रेता समिती आता ‘इलेक्टेड’

sakal_logo
By

पथविक्रेता समिती आता ‘इलेक्टेड’
मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया ः हरकतींसाठी ३१ पर्यंत मुदत

इचलकरंजी, ता. २३ ः पथविक्रेत्यांसाठी शासनाच्या विविध धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी पथविक्रेता समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी बायामेट्रिक सर्वेक्षणानुसार पथविक्रेत्यांची मतदार यादी निश्चित केली आहे. त्यावर सूचना व हरकती मागवल्या आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाने ही समिती गठीत केली जाणार आहे. नगरविकास विभागाच्या आदेशानुसार अशा प्रकारची प्रथमच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांमध्ये उत्सुकता आहे.
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत फेरीवाल्यांसाठी महापालिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील फेरीवाले तथा पथविक्रेत्यांचा २०१७ पासून बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू केले होते. ते सर्वेक्षण थांबवले. यामध्ये ९०२ पथविक्रेत्यांची नोंदणी झाली होती; पण त्यातील ४४ जणांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे ८५८ इतके पथविक्रेते निश्चित केले आहेत. त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळासह मिळकत विभागात उपलब्ध करून दिली आहे.
या यादीवर हरकती व सूचना मागवल्या आहेत. ३१ ऑगस्ट अंतिम मुदत आहे. त्यानंतर त्यांची यादी अंतिम केल्यानंतर पथविक्रेता समिती स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी पात्र पथविक्रेते हे मतदार असणार आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष मतदानाने समितीतील सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर या समितीच्या माध्यमातून पुढील काळात फेरीवाला झोन ठरवण्यासह पथविक्रेत्यांसाठी विविध शासकीय धोरणांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे या समितीला विशेष महत्त्व असणार आहे.
----------
नवीन समितीबाबत उत्सुकता
यापूर्वी २००९ व २०१४ मध्ये पथविक्रेता समिती नियुक्ती केली होती. ही समिती सिलेक्टेड होती; पण आता नवीन समिती इलेक्टेड असणार आहे. तर यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे या समितीबाबत आतापासूनच उत्सुकता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89695 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..