सिलाई वर्ल्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिलाई वर्ल्ड
सिलाई वर्ल्ड

सिलाई वर्ल्ड

sakal_logo
By

सिलाईचा ‘पारंपरिक कुर्ता व
काठ-पदर साडी महोत्सव’ !
लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी योजना
कोल्हापूर, ता. २३ ः आता महाराष्ट्रात लगबग सुरू आहे, बाप्पांच्या स्वागताची. आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत पारंपरिक पोशाख परिधान करून करावे, असे शास्त्राचेही मत आणि सध्याचा ट्रेंडही आहे. हाच ट्रेडिशनल ट्रेंड लक्षात घेऊन ‘सिलाई वर्ल्ड’ने आयोजित केला आहे, पारंपरिक पोशाखाचा खास महोत्सव. यामध्ये पुरुषांसाठी खास ‘कुर्ता महोत्सव’ असणार आहे, ज्यामध्ये आजच्या काळाला साजेशा आणि जीन्स वरही शोभून दिसणाऱ्या ट्रेंडी कुर्त्याची मोठी व्हरायटीज् उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सुंदर कलर्स व डिझाईन्स असणारे कुर्ते परिधान करून बाप्पांच्या मिरवणुकांमध्ये तुम्ही लक्षवेधी ठराल. पुरुषांसाठी फेस्टिव्ह कॅज्युअल्सदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत व त्यामध्येही दोनच्या खरेदीवर ७ मोफत किंवा एकाच्या खरेदीवर तीन मोफत’ अशी आकर्षक ऑफर देण्यात आलेली आहे.
महिलांसाठीही ‘गौरी गणपती काठ-पदर साडी महोत्सव’ आहे. गौरी-गणपतीच्या पूजेमध्ये या काठ-पदराच्या साड्यांना असणारे महत्त्व व त्यांची सुंदरता लक्षात घेऊन या खास साड्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध आहे. महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणजे ‘६ साड्या घेऊन जा व एक साडीचे पैसे द्या’ ही ऑफर. या ऑफरमुळे महिलांना आपल्या आवडत्या रंगातील तब्बल सहा साड्या खरेदी करण्याची आकर्षक संधी उपलब्ध झालेली आहे. या साड्यांमध्येही शालू, घागरा, बनारसी सिल्क, पैठणी, गढवाल सिल्क, नल्ली सिल्क, खण साड्या व डिझायनर साड्या असे असंख्य मनमोहक प्रकार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
लॉकडाऊनच्या २-३ वर्षांच्या अंतरानंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा होणार आहे. त्यामुळे स्त्री असो वा पुरुष प्रत्येकजण मोठ्या उत्साहात बाप्पांचे स्वागत करणार आहे. हे लक्षात घेऊनच हा उत्सव अधिक पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशातून आम्ही या महोत्सवाचे आयोजन केले आहे, असे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले.
सिलाई वर्ल्डच्या चौथी थी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर येथील शोरूम्समध्ये हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तेव्हा अधिकाधिक लोकांनी या ऑफरचा लाभ घेऊन आपल्या बाप्पांचा उत्सव पारंपरिक पोशाखात अधिक उत्साहात साजरा करावा, असे आवाहन सिलाई वर्ल्डने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89723 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..