मिशन गोल्ड चे पहिले पाऊल पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिशन गोल्ड चे पहिले पाऊल पूर्ण
मिशन गोल्ड चे पहिले पाऊल पूर्ण

मिशन गोल्ड चे पहिले पाऊल पूर्ण

sakal_logo
By

खेळाडूंची यादी पूर्णत्वाकडे
नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ‘मिशन गोल्ड कोल्हापूर’चे पहिले पाऊल पूर्ण

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत मिशन गोल्ड कोल्हापूरसाठीच्या खेळाडूंची यादी पूर्णत्वास आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा क्रीडा आलेख वाढता राहावा यासाठी विविध कल्पना राबवल्या जात असून, मिशन गोल्ड हे खेळाडूंना पदकाच्या आणखी समीप नेण्याचे पुढचे पाऊल म्हणावे लागेल.
ऑलम्पिक स्पर्धेमध्ये समाविष्ट असणारे खेळ, अशा खेळांमधे विशेष प्राविण्य असणारे खेळाडू यांच्यासाठी निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून विविध उपक्रम राबवले जातात. यातूनच मिशन गोल्डला सुरुवात झाली. सुरुवातीला अत्यल्प प्रतिसाद देणाऱ्या क्रीडा संघटनांना वेळाने का होईना जाग येऊन ९ प्रकारच्या खेळातील खेळाडूंची यादी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे आली आहे. यातील खेळाडूंना आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यासोबतच वैयक्तिक प्रशिक्षकही उपलब्ध असणार आहेत.
सध्या बास्केटबॉल,रग्बी,जलतरण, आर्चरी, हॉकी, फुटबॉल, तलवारबाजी, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स खेळासाठी राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळाडूंची यादी उपलब्ध झाली असून, अजूनही एक क्रीडा प्रकारासाठी खेळाडूंची यादीची प्रतीक्षा आहे.
या सर्व खेळाडूंसाठी ८० लाख रुपयांच्या वार्षिक खर्च अपेक्षित असून, खेळाडूंना वैयक्तिक मार्गदर्शनासह , मानसोपचार तज्ज्ञ, फिजिओ थेरपिस्ट ,आहार तज्ज्ञ, जिम ट्रेनर, स्पोर्ट्स मेडिसिन एक्सपर्ट, लॅब टेस्ट व विमा संरक्षण मिळणार आहे.

चौकट
मार्गदर्शक व तज्ज्ञांची नियुक्ती रखडली
राजकीय सत्तांतरानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शक व तज्ज्ञांची नियुक्ती रखडली आहे. याबाबत मंत्रालय स्तरावर निर्णय होण्याची प्रतीक्षा असून, निर्णयाविना मिशन गोल्ड लांबणीवर पडले आहे.

कोट
मिशन गोल्ड ही जिल्ह्यातील खेळाडूंना अधिक सक्षम बनवून ऑलिंपिक पदकांसाठी आणखी जवळ नेणारी महत्वाकांक्षी योजना आहे. एकूण १०० खेळाडू पहिल्या वर्षी यात सहभागी करून घेत पुढे ही योजना अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक खेळामध्ये कोल्हापूरचा खेळाडू जागतिक स्‍तरावर चमकावा यासाठी हे प्रयत्न आहेत.
डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89737 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..