उपनगर- कसबा बावडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपनगर- कसबा बावडा
उपनगर- कसबा बावडा

उपनगर- कसबा बावडा

sakal_logo
By

४५२०१
कसबा बावडा ः येथील येथील महापालिकेच्या राजर्षी शाहू शाळेच्या १५१ व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थांचा सत्कार झाला.

विद्यार्थ्यांनी डिजीटल युगाचा
वापर करावाः डी.सी. कुंभार

मनपा राजर्षी शाहू शाळेचा वर्धापन दिन

कसबा बावडा, ता. २३ ः शाळेच्या डिजीटल यंत्रणेचा वापर विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी करावा, असे आवाहन प्रशासनाधिकारी डी.सी. कुंभार यांनी केले. येथील महापालिकेच्या राजर्षी शाहू (शाळा क्रमांक ११) या शाळेच्या १५१ व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी नगरसेविका माधुरी लाड अध्यक्षस्थानी होत्या.
शाळेतील विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा, भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षा, महाराष्ट्र सभा हिंदी परीक्षा, टॅलेंट सर्च परीक्षा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आदी स्पर्धांच्या प्रमाणपत्रांचे वितरण झाले. सचिन चौगले यांनी विद्यार्थ्यांसाठी १११ वह्या दिल्या. भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक भोसले, शामराव पाटील, बावडा रेस्क्यू फोर्सचे मानसिंग जाधव, मुख्याध्यापक शिवराज नलवडे व पर्यवेक्षक विजय माळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार आदी उपस्थित होते. केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. कल्पना मैलारी व जान्हवी ताटे यांनी सूत्रसंचालन केले. सुशांत पाटील यांनी आभार मांडले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89741 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..