पेन्शनरांचे धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेन्शनरांचे धरणे आंदोलन
पेन्शनरांचे धरणे आंदोलन

पेन्शनरांचे धरणे आंदोलन

sakal_logo
By

‘ईपीएस ९५’ पेन्शनरांचा उद्या मोर्चा
कोल्हापूर ः देशभरातील सत्तर लाख ‘ईपीएस ९५’ पेन्शनरांना केंद्र सरकारच्या पेन्शनविरोधी धोरणामुळे एक हजारांच्या पेन्शनवर हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. पेन्शनर संघटनेने रस्त्यावरच्या लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई जिंकली असतानाही शासन पेन्शनची वाढीव रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात दिल्ली येथे संसदेवर बेमुदत धरणे आंदोलन होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील सर्व श्रमिक संघाच्या वतीने गुरुवारी (ता.२५) भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. विक्रम हायस्कूलच्या मैदानावरून सकाळी अकरा वाजता मोर्चा निघणार असून भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर निदर्शने केली जाणार आहेत. त्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अतुल दिघे, अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, नारायण मिरजकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89742 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..