सीआयआयतर्फे कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीआयआयतर्फे कार्यशाळा
सीआयआयतर्फे कार्यशाळा

सीआयआयतर्फे कार्यशाळा

sakal_logo
By

45166
कोल्हापूर : सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोन आणि टाटा पॉवरतर्फे आयोजित कार्यशाळेत बोलताना श्रीकांत बापट.

स्वच्छ उर्जा व्यवस्थापनावर
‘सीआयआय’तर्फे कार्यशाळा

कोल्हापूर, ता. २३ : सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोन आणि टाटा पॉवरतर्फे ‘महाराष्ट्रासाठी स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा व्यवस्थापन सोल्युशन्स’ यावर कार्यशाळा झाली. सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोनल कौन्सिलच्या माजी अध्यक्षा आणि कोरगावकर ऑइल गिन्नीन्ग अँड प्रेसिंग फॅक्टरीच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी कोरगावकर यांनी स्वागत केले. २०३० पर्यंत भारतातील कार्बनची तीव्रता २००५ च्या पातळीपेक्षा ४५ टक्के कमी करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला.
सीआयआय महाराष्ट्र पॅनेल ऑन एन्व्हायर्न्मेंटल सस्टेनेबिलिटी आणि इंडिया जॉन्सन कंट्रोल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बापट यांनी भारतीय उद्योगाच्या जवळपास ९० टक्के ‘एमएसएमईएस’कडे याविषयी कमी ज्ञान आणि जागरूकता आहे. ऊर्जेचा खर्च कमी करण्यासाठी आणि ते परिस्थिती किंवा संसाधने करण्यासाठी ते सतत पर्याय शोधतात. किफायतशीर आणि विश्वासार्ह वीज पुरवठा हा सर्वसमावेशक वाढीसाठी सर्वात मोठा उत्प्रेरक आहे, असे सांगितले.
‘डीआयसी’चे महाव्यवस्थापक सतिश शेळके उपस्थित होते. कोल्हापूर विभागातील आणि आसपासच्या ८० ते १०० उद्योग प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89744 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..