चिनी प्लास्टीक फुलांवर बंदी घाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिनी प्लास्टीक फुलांवर बंदी घाला
चिनी प्लास्टीक फुलांवर बंदी घाला

चिनी प्लास्टीक फुलांवर बंदी घाला

sakal_logo
By

03740

चिनी प्लास्टिक फुलांवर बंदी घाला
राजू शेट्टी यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २३ : चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांमुळे देशातील फूल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. लॅाकडाऊननंतर स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या उत्पादकांना चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे फटका बसत आहे. फूलशेती तोट्यात आहे. केंद्र सरकारने चिनी प्लास्टिक फुलांच्या वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घालवी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे आज केली.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की दोन वर्षांत कोरोना व चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण आहे. भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत सण व समारंभामध्ये जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू, अॅस्टर, शेवंती, गॅलार्डिया आदींच्या सुट्या व लॅडओलस, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ऑर्केड्स, अॅन्थुरियम या दांड्याच्या फुलांना प्रचंड मागणी असते. सध्या प्लास्टिक फुलांचा वापर विविध समारंभांत वाढला आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात नैसर्गिक फुलांचे दर गडगडले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका देशातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
वास्तविक, फूलशेतीसाठी शेतकऱ्यांना शेड नेट उभारण्यासाठी एकरी १० ते १५ लाख, तर ग्रीन हाऊससाठी एकरी ७० ते ७५ लाख रूरुपये खर्च येतो. सरकारकडून मिळणारे अनुदानही तुटपुंजे आहे. त्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा पडत आहे. फूल उत्पादकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या वापरावर व आयातीवर बंदी घालावी.

सकारात्मक निर्णयाचे सूतोवाच
याबाबत मंत्री यादव यांनी तातडीने पर्यावरण खात्याचे अतिरिक्त सचिव नरेश पाल गंगवार व सहसचिव सत्येंद्रकुमार यांना याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सूतोवाच केल्याचे श्री. शेट्टी यांना सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89762 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..