निपाणी ः क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निपाणी ः क्राईम
निपाणी ः क्राईम

निपाणी ः क्राईम

sakal_logo
By

महिलांच्या फसवणूक प्रकरणी
निपाणीत चौघांविरोधात फिर्याद
निपाणी, ता. २३ ः रोजगाराच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी चार संशयितांविरोधात येथील शहर पोलिस स्थानकात मंगळवारी (ता. २३) फिर्याद दाखल झाली आहे. आफरीन अलताफ जमादार (रा. निपाणी) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजितकुमार महादेव हिरवे (रा. शिवारे, जि. सातारा), प्रसाद हिंमतराव घाटगे (रा. यमगे, ता. कागल), अशोक रामचंद्र पाटील (रा. रेठरे, ता. वाळवा. जि. सांगली), काजल पाटील उर्फ कांबळे (रा. निपाणी) यांच्या विरोधात जमादार यांनी फिर्याद दिली आहे.
संशयितांनी रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली शहर परिसरातील महिलांकडून पैसे जमा करून घेतले. व्यवसायासाठी कच्चा माल दिला, मात्र त्यानंतर संशयित फरारी झाले आहेत. यामुळे अनेक महिलांची फसवणूक झाली आहे. संशयितांचा शोध घेऊन झालेल्या नुकसानीची परतफेड करावी, आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

पावतीसह नोंदणीचे पोलिसांचे आवाहन
दरम्यान एप्रिल ते जून अखेरपर्यंत ज्या महिलांनी संशयितांकडे पैसे जमा केले आहेत, अशांनी पावतीसह शहर पोलिसात नाव नोंद करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. फिर्यादीनुसार तपास कार्य चालविले असल्याचे पोलिस उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89770 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..