स्तुती कार्यशाळा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्तुती कार्यशाळा बातमी
स्तुती कार्यशाळा बातमी

स्तुती कार्यशाळा बातमी

sakal_logo
By

45198

स्तुती उपक्रमामुळे
आत्मनिर्भर भारताला बळ
प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे; आंबेडकर विद्यापीठात कार्यशाळेचे उद्‌घाटन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः संशोधनाला पाठबळ देण्यासाठी स्तुती (सिनरजिस्टिक ट्रेनिंग प्रोग्रॅम अँड टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर) सारख्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. स्तुतीमुळे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन स्तुती कार्यशाळेचे समन्वयक डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी केले. लखनौमधील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठात स्तुती कार्यशाळेच्या उद्‌घाटनात ते बोलत होते.
डॉ. सोनकवडे म्हणाले, हा कार्यक्रम संशोधन क्षेत्रात क्षमता वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी तयार केला आहे. जेव्हा महान विचारांनी एकत्र काम केले आणि विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी आणि पायाभूत सुविधा यासारख्या विविध क्षेत्रांत स्वयंपूर्ण बनले तेव्हाच पंतप्रधानांचे ‘आत्मनिर्भार भारत’ हे ध्येय पूर्ण होऊ शकते.
स्तुती प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन बाबासाहेब भीमराव आंबेडकर लखनऊ विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या साहाय्याने केले आहे. या उपक्रमात सात दिवस विविध प्राध्यापक मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
केंद्र सरकारच्या स्तुती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यशाळेचे उद्दिष्ट व्याख्याने आणि प्रशिक्षण सत्रांद्वारे प्रगत साहित्य आणि उत्पादन प्रक्रियेचे सशक्त ज्ञान प्रदान करणे आहे. कार्यशाळेसाठी देशभरातील १ केंद्रशासित प्रदेश आणि २८ पैकी १० राज्यांमधून प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजय सिंग, ‘आयआयटीबीएचयू वाराणसी’चे प्रा. राजीव मंडल, समन्वयक प्रा. बी. सी. यादव, प्रा. डॉ. रमेश चंद्र, डॉ. ए. के. यादव, डॉ. ए. के. मौर्य, डॉ. आर. के. बी. थापा उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89813 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..