कश्मिरा मोमीन मिसेस इचलकरंजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कश्मिरा मोमीन मिसेस इचलकरंजी
कश्मिरा मोमीन मिसेस इचलकरंजी

कश्मिरा मोमीन मिसेस इचलकरंजी

sakal_logo
By

45205
-----------
कश्मिरा मोमीन मिसेस इचलकरंजी
इचलकरंजीत मिसेस, मिस, प्रिन्सेस इचलकरंजी स्पर्धा

इचलकरंजी, ता. २४ : निर्मिती महिला मंचद्वारे आयोजित केलेल्या मिसेस, मिस व प्रिन्सेस इचलकरंजी २०२२ स्पर्धेमध्ये मिसेस इचलकरंजी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कश्मिरा मोमीन यांनी पटकावला. प्रिन्सेस इचलकरंजीमध्ये रिद्धी पदमुखे, मिस इचलकरंजीमध्ये पूजा सुतार यांनी प्रथम क्रमांकावर नाव कोरले. स्पर्धेमध्ये ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रथम फेरीमध्ये रॅम्प वॉक, दुसऱ्या फेरीमध्ये अतिशय नावीन्यपूर्ण कौशल्य सादरीकरण तर तिसऱ्‍या फेरीमध्ये प्रश्न उत्तर घेण्यात आली.
महिला सक्षमीकरण या मंचच्या प्रमुख उद्देशानुसार महिलांना स्वतःची ओळख बनवण्यासाठी मिसेस इचलकरंजी, मिस इचलकरंजी व प्रिन्सेस इचलकरंजी २०२२ स्पर्धा आयोजित केल्या होत्या. कार्यक्रम घोरपडे नाट्यगृहात झाला. स्पर्धेचे उद्‍घाटन निर्मिती मंचच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, उपाध्यक्ष सुचेता दिवाणी व परीक्षक ज्योती हिरेमठ, कोल्हापूर, स्नेहल पाटील, कुरुंदवाड व रसिका मुळे, रत्नागिरी आदींच्या हस्ते झाला. स्पर्धेमधील वेजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी, क्राऊन, सॅश, सर्टिफिकेट व स्वर्ण ज्वेलर्स यांच्याकडून ज्वेलरी सेट प्रदान केले. अंकिता कोले, वर्षा थोरवत, आराधना पाटील, मेघा माने, सरिता पांडव, प्रमोदिनी देशमाने, सचिन माने यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
--------------
स्पर्धेमधील विजेते असे ः
*मिसेस इचलकरंजी ः द्वितीय मेघा उत्तुरे, तृतीय पूनम मट्टीकली. बेस्ट स्माईल रविना नार्वेकर, बेस्ट अॅटिट्यूड रेणुका तांबेकर, वेस्ट पर्सनॅलिटी ऐश्वर्या राशिनकर, बेस्ट वॉक सोनाली सूर्यवंशी, बेस्ट अॅक्ट सुहासिनी बसण्णावर.
*मिस इचलकरंजी ः द्वितीय कृष्णा ढवळे, तृतीय श्वेता नाईक. बेस्टस्माईल तन्वी तारळेकर, बेस्ट अॅटीट्यूड माधवी मस्के, बेस्ट पर्सनॅलिटी भाग्यश्री शिंगाडे, बेस्ट वॉक अक्षता पाटील, बेस्ट अॅक्ट स्नेहल माळी.
*प्रिन्सेस इचलकरंजी ः द्वितीय प्रज्ञा रंगरेज, तृतीय नंदीनी डोंगरे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89845 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..