पाणी प्रश्नासाठीच २७ कोटीचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी प्रश्नासाठीच २७ कोटीचा निधी
पाणी प्रश्नासाठीच २७ कोटीचा निधी

पाणी प्रश्नासाठीच २७ कोटीचा निधी

sakal_logo
By

पाणी प्रश्नासाठीच २७ कोटींचा निधी
लवकरच महापालिकेला शासनाचे आदेश ः आमदार आवाडे यांची माहिती

इचलकरंजी, ता. २४ ः थकीत सहायक अनुदानापोटी प्राप्त झालेल्या ९८ कोटी पैकी उर्वरीत २७ कोटी रक्कम ही पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी वापरण्याबाबत शासनाकडून महापालिकेला लवकरच आदेश प्राप्त होतील. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन विनंती केली आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, ‘‘राज्य शासनाने थकीत सहायक अनुदानापोटी इचलकरंजी महापालिकेला ९८ कोटींचा निधी दिला होता. त्यातील सुमारे ७१ कोटींचा निधी कामगारांची देयदेणी भागवण्यासाठी वापरला आहे. उर्वरित २७ कोटी शिल्लक रक्कम मक्तेदारांची बिले भागवण्याचा प्रयत्न काही माजी लोकप्रतिनिधी व आत्ताचे अधिकारी करीत आहेत. पण ही रक्कम मक्तेदारास देता येणार नाही. त्याऐवजी पिण्याच्या पाणी प्रश्नावर ही रक्कम खर्च करावी, अशी मागणी करणारे पत्र आपण महापालिकेला दिले आहे. पण त्या पत्राचे उत्तर मला मिळालेले नाही. संबंधित मंडळींनी शासनाच्या एका जुन्या आदेशाचा दाखला देत मंत्र्यांचा आदेश मिळवला आहे. त्यामुळे मक्तेदाराची बिले भागवण्यासाठी ही रक्कम वापरण्याची शक्यता आहे.
याबाबत आपण मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन हा निधी मक्तेदारांची बिले भागवण्यासाठी नव्हे, तर पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी वापरावा, अशी मागणी करणारे पत्र दिले आहे. यामध्ये कृष्णा योजनेची उर्वरित जलवाहिनी बदलण्याचा आग्रह धरला आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनाही ही बाब पटली आहे. त्यानुसार या निधीचा वापर करण्याबाबत महापालिकेला पत्र पाठवण्यात येईल, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगीतल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले. प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, स्वप्नील आवाडे आदी उपस्‍थित होते.
---------
त्रास देण्यासाठी प्रश्न प्रलंबित
अडीच वर्षे तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने आमचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले. मी भाजपला पाठिंबा दिल्याच्या कारणातून आम्हाला त्रास देण्यासाठी राजकारण करीत हे प्रश्न प्रलंबित ठेवले. पण आता आमचे सरकार आले आहे. त्यामुळे आमचे सर्व प्रलंबित प्रश्नी मार्गी लागतील, असे आमदार आवाडे यांनी या वेळी सांगीतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89856 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..