उद्योगांतून देशाची प्रगती साधा; प्रांताधिकारी वाघमोडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योगांतून देशाची प्रगती साधा; प्रांताधिकारी वाघमोडे
उद्योगांतून देशाची प्रगती साधा; प्रांताधिकारी वाघमोडे

उद्योगांतून देशाची प्रगती साधा; प्रांताधिकारी वाघमोडे

sakal_logo
By

45241
गडहिंग्लज : नवउद्योजकांच्या मेळाव्यात बोलताना बाबासाहेब वाघमोडे. डावीकडून गणेश गोडसे, दिनेश पारगे, शरद मगर आदी. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

उद्योगांतून देशाची प्रगती साधा
प्रांताधिकारी वाघमोडे; गडहिंग्लजला नवउद्योजक मार्गदर्शन मेळावा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : तरुणांना उद्योगाच्या माध्यमातून करिअर करता येते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून राबवलेला मार्गदर्शन मेळावा त्यासाठीची एक मोठी संधी आहे. त्याचा लाभ घेऊन तरुणांनी उद्योजक बनावे आणि स्वत:च्या आर्थिक उन्नतीसह देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे आवाहन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, विविध शासकीय विभागांतर्फे बचत भवनात आयोजित उद्योजक-नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी अनिल मगर, लीड बँक मॅनेजर गणेश गोडसे, आर्थिक साक्षरता समुपदेशक उदय जोशी, जिल्हा उद्योग विकास केंद्राच्या श्रीमती चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाघमोडे म्हणाले, ‘‘या भागात शेती उत्कृष्ट आहे. पाऊसही चांगला आहे; परंतु उद्योगांची वानवा आहे. त्यामुळे तरुणांना उद्योग उभे करण्याची मोठी संधी आहे. आपापल्या कुवतीनुसार छोट्या उद्योगांची माहिती या प्रशिक्षणातून घ्यावी. सर्वांना आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा असते; परंतु मार्गदर्शनाअभावी त्यांना वाव मिळत नाही. या मेळाव्याद्वारे ही संधी उपलब्ध झाली असून त्याचा लाभ घ्यावा.’’
पारगे म्हणाले, ‘नोकरीच्या मागे न लागता उद्योग उभे करूनही करिअर करणे शक्य आहे. एखादी नवीन संकल्पना सोशल मीडियाद्वारे उचलून धरल्यास त्या संकल्पनेचे व्यवसायात रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही. तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोनातून उद्योगाकडे पाहून करिअर घडवावे.’
मगर म्हणाले, ‘‘हा मेळावा तरुणांच्या आयुष्याला दिशा देणारा आहे. करिअर म्हणजे केवळ नोकरी नव्हे. व्यवसायातूनही करिअर घडविता येते. त्यासाठी बँका, महामंडळे, शासकीय योजनांचे सहकार्य मिळेल.’’ जोशी यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा हेतू सांगितला. मेळाव्यात २२ शासकीय विभागांचे आणि ११ बँकांचे स्टॉल उभारले होते.

चौकट...
‘टार्गेट’ पाहू नका
मगर म्हणाले, ‘‘नवउद्योजकांच्या कर्ज प्रकरणांकडे बँकांनी केवळ टार्गेट पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाहू नये. त्यांना आपलेपणाची वागणूक देण्यासह कर्जाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून नवे उद्योजक उभे करावेत. तरुण उद्योजकांनीही कर्ज परतफेडीसाठी सकारात्मक भावना ठेवल्यास निश्‍चित प्रगती साधता येते.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89871 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..