कर्मयोगी माहितीपटाचे गडहिंग्लजला अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मयोगी माहितीपटाचे गडहिंग्लजला अनावरण
कर्मयोगी माहितीपटाचे गडहिंग्लजला अनावरण

कर्मयोगी माहितीपटाचे गडहिंग्लजला अनावरण

sakal_logo
By

45268
गडहिंग्लज : विद्याप्रसारक मंडळ व घाळी प्रतिष्ठान निर्मित कर्मयोगी माहितीपटाचे अनावरण करताना बाबासाहेब वाघमोडे. शेजारी दिनेश पारगे, शरद मगर, डॉ. सतीश घाळी, उदय जोशी आदी.

कर्मयोगी माहितीपटाचे
गडहिंग्लजला अनावरण
गडहिंग्लज, ता. २५ : येथील विद्याप्रसारक मंडळ व घाळी प्रतिष्ठान निर्मित ‘कर्मयोगी : डॉ. शिवलिंग घाळी’ या माहितीपटाचे अनावरण करण्यात आले. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते.
प्रा. सुनील देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाघमोडे, डॉ. घाळी यांचे भाषण झाले. संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक महेश घाळी, डॉ. सुरेश संकेश्‍वरी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष उदय जोशी, बसवराज आजरी आदी उपस्थित होते. प्रा. तेजस्विनी गारगोटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.
दरम्यान, कर्मयोगी या माहितीपटातून डॉ. घाळी यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. प्रा. शिवाजी पाटील यांची संकल्पना, अजय कुरणे यांचे दिग्दर्शन, तर शेखर गुरव यांचे संकलन आहे. लेखन प्रा. सुभाष कोरे, निवेदन मधुरा हराडे, कॅलिग्राफी विकास मुनीव, तर सहायक छायांकन केंप्पान्ना कांबळे व सुदर्शन शिरोळे यांचे आहे. वेदांत देसाई, सुशांत सावंत, डॉ. संभाजी जगताप, अरुण पाटील, वैशाली पाटील, ऊर्मिला कदम, इंद्रजित गाडे यांच्यासह गडहिंग्लज कला अकादमीच्या बालकलाकारांनी भूमिका केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89899 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..