दूध संघाच्या दवाखान्यात कायमस्वरुपी डॉक्टर द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दूध संघाच्या दवाखान्यात कायमस्वरुपी डॉक्टर द्या
दूध संघाच्या दवाखान्यात कायमस्वरुपी डॉक्टर द्या

दूध संघाच्या दवाखान्यात कायमस्वरुपी डॉक्टर द्या

sakal_logo
By

दूध संघाच्या दवाखान्यात
कायमस्वरुपी डॉक्टर द्या
कोवाडला मागणी; पशुपालकांची होतेय गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २४ : येथील गोकुळ दूध संघाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेले चार महिने कायमस्वरुपी डॉक्टर नाही. रिलिव्हर डॉक्टरांवर कारभार सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेत अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. येथे कायमस्वरुपी डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.
कोवाड भाग हा गोकुळ संघाचा सर्वांत मोठा दुधाचा पॉकेट समजला जातो. जनावरांची संख्या जास्त असल्याने संघाकडे दुधाचे संकलनही मोठ्या प्रमाणावर होते. येथे दूध उत्पादकांच्या जनावरांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी गोकुळ दूध संघाचा फिरता दवाखाना आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी येथील नेसरी रोडला दवाखान्याचे कार्यालय आहे. संघाने दिलेल्या वेळापत्रकानुसार दररोज डॉक्टरांची संबंधित गावातून भेट असते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जनावरांच्या गोठ्यात जाऊन सेवा दिली जाते. काही गावांतून जनावरे तपासणीसाठी दूध संस्थांच्या शेजारी जनावरांचे खोडे उभे केले आहेत. सध्या गोकुळ संघातर्फे वासरू संगोपन योजना सुरू आहे. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांत जनजागृतीही केली जात आहे. तसेच उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांना तत्पर सेवा देण्यावर संघाचा भर आहे; पण मार्च महिन्यात कोवाड येथील दवाखान्यातील डॉक्टर सोडून गेले. त्यानंतर येथे रिलिव्हर डॉक्टरांची नेमणूक केली जाते. कधी गडहिंग्लज, बेळगाव, तर कधी चंदगड येथील डॉक्टरांना येथे पाठविले जाते. हे डॉक्टर दिवसभर काम करून सायंकाळी परत जातात. त्यामुळे सायंकाळनंतर रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना वैद्यकीय सेवेची खरी अडचण भासते. गेले चार महिने बाहेरच्या डॉक्टरांवर दवाखाना सुरू आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे कायमस्वरुपी डॉक्टरांची नियुक्ती केल्यास येथील शेतकऱ्यांना २४ तास वैद्यकीय सेवा मिळू शकते. त्यासाठी संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवीन डॉक्टरांची नियुक्ती करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी.
--------------
कोट
कोवाड येथील दवाखान्यात सध्या रिलिव्हर डॉक्टर काम करत आहेत. तशी येथे कायमस्वरुपी डॉक्टरांची गरज आहे. त्यानुसार वरिष्ठांना याबाबत कळविले आहे. लवकरच नवीन डॉक्टरांची त्या ठिकाणी नेमणूक केली जाईल.
- अविनाश जोशी, सहायक व्यवस्थापक, गोकुळ, पशुवैद्यकीय विभाग, गडहिंग्लज.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89908 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..