लाच लुचपत फॉलोअप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाच लुचपत फॉलोअप
लाच लुचपत फॉलोअप

लाच लुचपत फॉलोअप

sakal_logo
By

४५३८७

पोलिस नाईक तिवडेला
१ कोटी लाचप्रकरणी अटक
कोल्हापूर, ता. २४ ः जमीन दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी एक कोटीची लाचेची मागणी केल्याप्रकरणी बडतर्फ पोलिस नाईक याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. जॉन वसंत तिवडे (सध्या रमणमळा) असे संशयिताचे नाव असल्याचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.
संशयित तिवडे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा अंगरक्षक होता. एमआरटी कौसिल पुणे येथील जमिनीच्या दाव्याचा निकाल तक्रारदारांच्या बाजूने लावून देण्यासाठी एक कोटीची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ ऑगस्टला गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, संशयितावर एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये कारवाई केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. त्याला कळंबा मध्यवर्ती कारागृहातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची कोठडी सुनावली असल्याचे बुधवंत यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89933 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..