जिल्हा बॅंका राज्य बॅंकेत विलिनीकरणावरून खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅंका राज्य बॅंकेत विलिनीकरणावरून खळबळ
जिल्हा बॅंका राज्य बॅंकेत विलिनीकरणावरून खळबळ

जिल्हा बॅंका राज्य बॅंकेत विलिनीकरणावरून खळबळ

sakal_logo
By

जिल्हा बॅंका विलिनीकरणाची धाकधूक
आर्थिक तोट्याचे कारण; केंद्रीय सहकार खात्याच्या हालचाली; अद्याप स्पष्टता नाही
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २४ : शेतकऱ्यांची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका आता राज्य सहकारी बॅंकांमध्ये विलिन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय सहकार विभागाकडून यासंदर्भात अहवाल तयार केला जात आहे. सेवा संस्थांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या जिल्हा बॅंकांऐवजी राज्य बॅंका शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा वेळेत आणि अपेक्षेनूसार पूर्ण करू शकणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे बॅंक विलिनीकरणाला विरोध होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात धाकधूक वाढली आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा बॅंकांची शिखर बॅंक म्हणून राज्य बॅंकेकडे पाहिले जाते. रिझर्व्ह बॅंक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकां यांच्या महत्वाचा दुवा म्हणून राज्य बॅंक काम करत आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांशी बॅंका तोट्यात आहेत. या बॅंकांना उभारी देण्यासाठी राज्य बॅंकेत विलिन केली जाण्याची चर्चा आहे. मात्र, कोल्हापूर जिल्हा बॅंकेसाठी ८० कोटी प्राप्तीकर भरत असेल, शेतकऱ्यांना विविध माध्यमातून वेळेत आणि अपेक्षीत कर्ज देत असतील तर अशा नफ्यातील बॅंकांबाबत हा निर्णय अन्यायकारक ठरणार आहे. जिल्ह्या बॅंकांकडे सरकारचे लक्ष नसते. यामध्ये मनमानी कारभार सुरू असतो, अशी एक ना अनेक कारणे सांगत जिल्हा बॅंकां विलिन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. येत्या तीन महिन्यात याची अमलबजावणी सुरु होईल, अशी माहिती आहे.

यापूर्वीही असाच निर्णय...
यापूर्वी जिल्हा बॅंक विलिनिकरणाबाबत २६ जून २०२० ला नागरी सहकारी बॅंकांसाठीच्या बॅंकिंग कायद्यात बदल केला आहे. कायद्यात केलेल्या सुधारणा १ एप्रिल २०२१ पासून नागरी सहकारी बॅंकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकां लागू झाल्या आहेत. यामध्ये ज्या जिल्हा बॅंका आर्थिक अडचणीत आहेत. त्या बॅंकांना राज्य बॅंकेत विलिन करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना होत्या. मात्र, यावर अंतिम निर्णय रिझर्व्ह बॅंकेकडून घेतला जाणार होता. आता पुन्हा जिल्हा बॅंका राज्य बॅंकेत विलिन करण्यावरून खळबळ उडाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89957 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..