समूहगीतमध्ये करंबळी प्रशाला प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समूहगीतमध्ये करंबळी प्रशाला प्रथम
समूहगीतमध्ये करंबळी प्रशाला प्रथम

समूहगीतमध्ये करंबळी प्रशाला प्रथम

sakal_logo
By

45314
गडहिंग्लज : समूहगीत गायन स्पर्धेतील विजेत्या करंबळीच्या संघाला बक्षीस वितरणप्रसंगी प्रा. किसनराव कुराडे, शंकरराव नंदनवाडे, डॉ. एस. एम. कदम, तानाजी चौगुले आदी.

समूहगीतमध्ये करंबळी प्रशाला प्रथम
शिवराजतर्फे संयोजन; साई इंटरनॅशनल द्वितीय, तर साधना तृतीय
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : येथील शिवराज महाविद्यालयातर्फे आयोजित देशभक्तिपर समूहगीत गायन स्पर्धेत करंबळीच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. साई इंटरनॅशनल स्कूलने द्वितीय, तर साधना हायस्कूलने तिसरा क्रमांक मिळविला. वि. दि. शिंदे हायस्कूल व संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयाने उत्तेजनार्थचे पारितोषिक पटकावले. शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलने विशेष प्रोत्साहनपर बक्षीस मिळविले.
स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग घेतला. देशभक्तिपर गीतांनी महाविद्यालयाचा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता. देशाच्या शौर्याचा इतिहास बुलंद करणाऱ्या गीतांनी अंगावर शहारे आणली. शिवराजचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, संचालक बसवराज आजरी, शंकरराव नंदनवाडे, प्रा. बिनादेवी कुराडे, मुख्याध्यापिका गौरी शिंदे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविले. परीक्षक गोंधळी, दीपक चौगुले, सुप्रिया पाटील यांचा सन्मान केला. परीक्षकांनी जिंदगी मौत न बन जाये संभालो यारो या गीतांचे सामूहिक गायन केले.
स्वरसाधना संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र बुवा, अमन यूथ सर्कलचे सादिक लमतुरे, हबीब मकानदार, हारुण पटेल, शिवराजचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. पर्यवक्षक प्रा. टी. व्ही. चौगुले यांनी स्वागत केले. बुवा, प्रा. कुराडे, डॉ. कुराडे, युनूस नाईकवाडे, प्राचार्य डॉ. कदम यांची भाषणे झाली. ग्रंथपाल संदीप कुराडे, पर्यवेक्षक प्रा. चौगुले, समन्वयक प्रा. जयवंत पाटील व संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी संयोजन केले. सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. श्रद्धा पाटील, प्रा. आशा पाटील, प्रा. प्रियांका जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89970 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..