महाडीक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडीक बातमी
महाडीक बातमी

महाडीक बातमी

sakal_logo
By

४५३२५


कोल्हापूरची विकासकामे मार्गी लावू
केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल; खासदार महाडिक यांना दिली ग्वाही
कोल्हापूर, ता. २४ ः कोल्हापूर जिल्ह्याचे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी संसदेमध्ये पाठपुरावा करण्याबरोबरच शेतकरी, साखर कारखानदार, वाहतुकीचे प्रश्‍न यांसारख्या विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर खासदार धनंजय महाडिक अत्यंत उल्लेखनीयरीत्या चर्चा घडवून आणत आहेत, अशा शब्दात केंद्रीय विधी न्याय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्याची प्रशंसा केली. कोल्हापूरचे विविध प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी महाडिक यांना दिली.
श्री. बघेल जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात त्यांनी श्री. महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली. शाल, श्रीफळ आणि महालक्ष्मीची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अरुंधती महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, विश्‍वराज महाडिक, सत्यजित कदम उपस्थित होते.
चर्चेत खासदार श्री. महाडिक यांनी जिल्ह्याच्या विविध विकासकामांबाबत मांडणी केली. सर्किट बेंचचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. सर्किट बेंच झाल्यास ५ जिल्ह्यांतील हजारो पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचणार असल्याचे सांगितले. कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा, कोल्हापूरला पर्यटनदृष्ट्या चालना देण्यासाठी आणि स्थानिक व्यापाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्याची गरज, महापुराच्या काळात बाहेरून येणाऱ्‍यांना कोल्हापुरात प्रवेश बंद होऊ नये, यासाठी बास्केट ब्रिजची गरज खासदार महाडिक यांनी अधोरेखित केली.
माजी नगरसेवक संजय निकम, संग्राम निकम, इंद्रजित जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89977 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..