राजस्थान घटनेचा गडहिंग्लजला निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजस्थान घटनेचा गडहिंग्लजला निषेध
राजस्थान घटनेचा गडहिंग्लजला निषेध

राजस्थान घटनेचा गडहिंग्लजला निषेध

sakal_logo
By

45320
गडहिंग्लज : राजस्थानमधील घटनेबाबत नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना निवेदन देताना विविध संघटनांचे पदाधिकारी.

राजस्थानमधील घटनेचा
गडहिंग्लजमध्ये निषेध
गडहिंग्लज, ता. २४ : राजस्थानमधील सुराना येथे माठातील पाणी प्याल्याने बेदम मारहाण करून तिसरीत शिकणाऱ्या एका दलित मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचा येथील विविध संघटनांतर्फे जाहीर निषेध करून मारहाण करणाऱ्या संबंधित शिक्षकाला फाशी द्यावी, अशी मागणी केली आहे.
या वेळी प्रांत कार्यालयासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या घटनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. जनता दलाचे नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष परशुराम कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे एस. आर. कांबळे, दलित महासंघाचे बाबूराव आयवाळे, रिपाइंचे दिलीप कांबळे, एस. पी. थरकार आदींची भाषणे झाली. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना राजस्थानमधील या क्रूर कृत्याने देश हादरला आहे. शिक्षकाच्या मारहाणीत एखाद्या मुलाचा मृत्यू होणे ही घटना दुर्दैवी आहे. त्याचा निषेध असून त्या जातीयवादी व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यावी. तसेच जिल्ह्यातील साजणी येथील एका तरुणीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या घटनेची चर्चा पाहता ही घटना आत्महत्या नसून ती घातपात असल्याचा संशय आहे. या दोन्ही घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. वंचितचे तालुकाध्यक्ष अर्जुन दुंडगेकर, आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष रमेश शिंगे, भीमराव नंदनवाडे, अशोक कांबळे, अनिल माने, सूरज कांबळे, भीमराव माहिते, अजय कांबळे, प्रकाश कांबळे, रवींद्र कांबळे, महेश कांबळे, गणेश कांबळे, रमेश कांबळे, विजय शिरगावकर, महादेव खातेदार आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89982 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..