एलसीबी बंद झाल्याने इमारतीला अवकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलसीबी बंद झाल्याने इमारतीला अवकळा
एलसीबी बंद झाल्याने इमारतीला अवकळा

एलसीबी बंद झाल्याने इमारतीला अवकळा

sakal_logo
By

ich2४७.jpg
इचलकरंजी ः एलसीबीचे कामकाज बंद केल्यानंतर इमारत परिसरात अशी अस्वच्छता पसरली आहे.

एलसीबी बंद झाल्याने इमारतीला अवकळा
पोलिस अधिकारी निवासस्थानाची पुन्हा दुरवस्थेकडे वाटचाल; वापर होण्याची गरज
इचलकरंजी, ता. २४ ः येथील थोरात चौकात असलेले एलसीबी कार्यालय बंद केले. त्यामुळे पोलिस अधिकारी निवासस्थान म्हणून मूळ ओळख असलेल्या या इमारत परिसराला अवकळा निर्माण झाली आहे. दुरवस्थेकडून सुस्थितीकडे असा या इमारतीचा प्रवास झाला होता. मात्र आता त्याचा वापर बंद झाल्यामुळे पुन्हा या इमारतीची पुन्हा दुरवस्था होण्याची शक्यता आहे. सध्या या इमारतीच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत आहे.
शहरातील पोलिस अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान म्हणून थोरात चौकात पोलिस कॉलनी वगळता दोन इमारती आहेत. यामध्ये एक पोलिस निरीक्षकांसाठी स्वतंत्र इमारत आहे. तर दुसऱ्या इमारतीमध्ये दोन पोलिस उपनिरिक्षकांसाठी निवासस्थानाची सोय आहे. त्यांचा वापर तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र काही पोलिस अधिकाऱ्यांनी येथे गैरसोय होत असल्याचे कारण देत वापर टाळला. त्यामुळे या दोन्ही इमारतींची वापर नसल्याने दुरवस्था झाली. अनेक वर्षे या दोन्ही इमारती विनावापर पडून होत्या. त्यामुळे या इमारतींची रयाच गेली होती.
दरम्यान, इचलकरंजीतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन शहरात स्वतंत्र एलसीबी शाखा सुरू केली. या शाखेच्या कार्यालयासाठी मध्यवर्ती ठिकाण मिळत नव्हते. त्यावेळी या कार्यालयासाठी पोलिस उप निरीक्षकांसाठी बांधलेल्या इमारतीचा वापर करण्याचा पर्याय समोर आला. त्यानंतर या मोडकळीस आलेल्या इमारतीची डागडुजी केली. तेथे एलसीबीचे कार्यालय दिमाखात सुरू झाले. तर पोलिस निरीक्षकांसाठी असलेल्या इमारतीचाही तत्कालीन अधिकाऱ्यांनी पुन्हा वापर सुरू केला. त्यामुळे या दोन्ही इमारतींचे भाग्य उजाळले.
पण आता पुन्हा या दोन्ही इमारतींचा वापर होत नसल्याची बाब पुढे आली आहे. यातील एलसीबी शाखा बरखास्त केली. त्यामुळे या इमारतीच्या कार्यालयाचा कुलूप लागले. एकेकाळी या इमारतीने मोठा रुबाब अनुभवला आहे. पण आता या इमारतीच्या परिसराला अवकळा आली आहे. इमारतीसमोर शोभेची झाडे फुलवली होती. आता त्याचे रुपांतर झुडपांमध्ये होताना दिसत आहे. अद्यापही ही इमारत सुस्‍थितीत आहे. तीचा वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा पूर्वीप्रमाणे या इमारतीची दुरवस्था होण्यास वेळ लागणार नाही.
-------------
वाहतूक नियंत्रण शाखेसाठी उपयुक्त
सध्या शिवतीर्थ परिसरात शहर वाहतूक शाखा कार्यरत आहे. पण शिवतीर्थ सुशोभिकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात शहर वाहतूक शाखेचे कार्यालय स्थलांतर करावे लागणार आहे. त्यासाठी अद्याप ठिकाण निश्चीत झालेले नाही. एलसीबी कार्यालय पुन्हा सुरु होणार नसेल तर शहर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी ही इमारत वापरणे सोयीचे होऊ शकते. त्यामुळे इमारत सुस्थितीत राहण्यास मदत होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89987 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..