प्रोत्साहनात्मक रक्कम देण्यासाठी हालचाल सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रोत्साहनात्मक रक्कम देण्यासाठी हालचाल सुरु
प्रोत्साहनात्मक रक्कम देण्यासाठी हालचाल सुरु

प्रोत्साहनात्मक रक्कम देण्यासाठी हालचाल सुरु

sakal_logo
By

‘प्रोत्साहन’चे एक
सप्टेंबरपासून वाटप
माहितीचे होणार शासकीय ऑडिट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ स्पटेंबरपासून प्रोत्साहनात्मक ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा बॅंकेकडून सेवा संस्थांच्या पातळीवर घेतल्या जाणाऱ्या माहितीचे शासकीय ऑडिट केले जाणार आहे. मंगळवार (ता. ३०) ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतेड केली आहे. त्या शेतकऱ्यांना जास्तीतजास्त कर्जावर ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जेवढी कमी असणारी रक्कम दिली जाणार आहे. ज्या कर्जदार सभासदाने २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात कर्जाची नियमित परतफेड केली आहे. अशा पात्र सभासदांना प्रोत्साहनात्मक अनुदानाचा लाभ होणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच सेवा संस्थांच्या पातळीवर सभासदांचे आधारकार्ड लिंक करण्याचे काम जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून सुरू आहे. सभासदांनी सोमवारपर्यंत (ता. २९) जिल्हा बॅंकेच्या ज्या-त्या शाखेत आधारकार्ड व आधारकार्ड लिंक करण्याचा फॉर्म देण्याचे आवाहन जिल्हा बॅंकेने केले आहे. दरम्यान, जे पात्र शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांचे शासकीय ऑडिट होईल. त्यानंतर यातून पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

३५० कोटींचा लाभ
कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाखांहून अधिक सभासद आहेत. यापैकी ८० टक्के शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली आहे. यासाठी सुमारे ३०० ते ३५० कोटी रुपये मिळू शकणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90002 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..