शाहीर आझाद नायकवडी यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहीर आझाद नायकवडी यांचा सत्कार
शाहीर आझाद नायकवडी यांचा सत्कार

शाहीर आझाद नायकवडी यांचा सत्कार

sakal_logo
By

१७०२
श्री शिवाजी हायस्कूलचे यश
कसबा तारळे ः येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षेत यश प्राप्त केले. २५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ते सर्व विद्यार्थी यशस्वी झाल्याची माहिती प्राचार्य ए. एस. भागाजे यांनी दिली. अनुष्का पाटील व पार्थ पाटील यांनी १४० गुण प्राप्त केले असून १०० पेक्षा जास्त गुण मिळवून १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी १२ हजार अशी सलग चार वर्षांपर्यंत एकूण ४८ हजारांची शिष्यवृत्ती शासनाकडून मिळणार आहे. विद्यार्थ्यांना एस. आर. सिद, एस. एम. ऱ्हायकर, एस. जी. गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. निवृत्त प्राचार्य एस. बी. पाटील, बी. पी. शितोळे, सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हिंदूराव खामकर, सचिव एस. एन. पाटील, सहसचीव जयसिंग खामकर, कार्याध्यक्ष सुभाष खामकर व संचालक मंडळाचे प्रोत्साहन लाभले.

सर्जेराव पाटील यांची निवड
पुनाळ : येथील माजी उपसरपंच व विद्यमान बलभीम विकास सेवा संस्थेचे संचालक सर्जेराव आबा पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून फेरनिवड करण्यात आली. प्रथमतः पाच वर्षे त्यानंतर आता शासन निर्णयानुसार वयाच्या सत्तर वर्षांपर्यंत त्यांची नेमणूक केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. त्यांना गुणवंत कामगार सेवा संघटनेचे सहकार्य लाभले.

जयसिंगपुरात गृहनिर्माण संस्थेची सभा
जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपालिका नोकर लोकांची सहकारी गृहनिर्माण संस्थेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज स्मृती भवन येथे झाली. अध्यक्ष संदीपराव जाधव, उपाध्यक्ष अख्तर नालबंद, सचिव सुरेश वडर, संचालक सुधाकर कुलकर्णी, नरेंद्र निंबाळकर, मोहन पाटोळे, प्रकाश कांबळे, रवींद्र कांबळे, नीलेश कुंभार, स्वाती मोडक, सुवर्णा वाघमारे उपस्थित होते. विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले.
-----------
१४०५
कोतोलीत देणगीदारांचा सत्कार
तुरुकवाडी ः कोतोली (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विश्वास ॲग्रो फार्म इंगवलेवाडी यांच्यावतीने ग्रामपंचायतीला ११ हजारांची स्टीलची तिरडी दिल्याबद्दल विश्वास पाटील, प्रतीक पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. सरपंच अशोक कुंभार यांनी स्वागत केले. सुजाता पाटील, उपसरपंच संपत पाटील, बळवंत पाटील, सुजिता य. पाटील, स्वाती केसरकर, लता लोहार, कृष्णा पाटील, लक्ष्मण कर्नाळे, संभाजी पाटील, रंगराव पाटील, दतात्र्य कुंभार, भीमराव कुंभार आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी दीपक गणधर यांनी आभार मानले.

1721
शाहीर नायकवडी यांचा सत्कार
कसबा तारळे ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय स्वातंत्र्याची गौरवगाथा सांगणाऱ्या पोवाड्याची निर्मिती व सादरीकरण केल्याबद्दल येथील सुपुत्र शाहीर विशारद आझाद नायकवडी यांचा मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोतवाल तानाजी पाटील यांनी स्वागत केले. मंडल अधिकारी गीते यांच्या हस्ते नायकवडी यांचा सत्कार झाला. दुर्गमानवडचे माजी सरपंच विष्णू पाटील, तलाठी अजिंक्य पाटील, धर्मा भोगूलकर (तळगाव), शशिकांत भोई, लक्ष्मण गावडे, संदीप पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90013 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..