शाहीर आझाद नायकवडी यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहीर आझाद नायकवडी यांचा सत्कार
शाहीर आझाद नायकवडी यांचा सत्कार

शाहीर आझाद नायकवडी यांचा सत्कार

sakal_logo
By

45604

हुपरीत आंबेडकरवादी संघटनांची
अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शने
हुपरी : राजस्थान येथील शाळकरी मुलाच्या जातीयवादी मानसिकतेतून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ तसेच साजणी येथील मुलीच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पट्टणकोडोली शहर रिपब्लिकन पक्ष (आठवले) तसेच आंबेडकरवादी पक्ष संघटनांतर्फे निदर्शने केली. हुपरीचे पोलिस उपनिरीक्षक हजारे यांना निवेदन दिले. बस स्थानक परिसरात आंदोलन झाले. रिपाइंचे पक्षाचे आयटी सेल उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, अनिल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे, प्रवीण भाटणवाडे, वंचितचे विलास कांबळे, आशिष त्यागी, पोपट कांबळे सुनील रास्ते आदींनी सहभाग घेतला.

45605
नविद मुश्रीफांकडून रुग्णांची विचारपूस
मुरगूड : येथे डेंगीसदृश साथीच्या पार्श्वभूमीवर आज मुरगूड ग्रामीण रुग्णालयास गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवनाथ डवरी यांच्याकडून त्यांनी साथीबाबतची सद्यःस्थिती जाणून घेतली. दरम्यान, डेंगीमुळे मृत्यू झालेल्या स्मिता किरण मगदूम यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन नातेवाईकांचे
सांत्वन केले. बी. एम. पाटील, डॉ. सुनील चौगले, विकास पाटील, दिग्विजय भैय्या पाटील, रणजित सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

१७०२
श्री शिवाजी हायस्कूलचे यश
कसबा तारळे ः येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षेत यश प्राप्त केले. २५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ते सर्व विद्यार्थी यशस्वी झाल्याची माहिती प्राचार्य ए. एस. भागाजे यांनी दिली. अनुष्का पाटील व पार्थ पाटील यांनी १४० गुण प्राप्त केले असून १०० पेक्षा जास्त गुण मिळवून १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी १२ हजार अशी सलग चार वर्षांपर्यंत एकूण ४८ हजारांची शिष्यवृत्ती शासनाकडून मिळणार आहे. विद्यार्थ्यांना एस. आर. सिद, एस. एम. ऱ्हायकर, एस. जी. गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. निवृत्त प्राचार्य एस. बी. पाटील, बी. पी. शितोळे, सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हिंदूराव खामकर, सचिव एस. एन. पाटील, सहसचीव जयसिंग खामकर, कार्याध्यक्ष सुभाष खामकर व संचालक मंडळाचे प्रोत्साहन लाभले.

03176
सर्जेराव पाटील यांची निवड
पुनाळ : येथील माजी उपसरपंच व विद्यमान बलभीम विकास सेवा संस्थेचे संचालक सर्जेराव आबा पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून फेरनिवड करण्यात आली. प्रथमतः पाच वर्षे त्यानंतर आता शासन निर्णयानुसार वयाच्या सत्तर वर्षांपर्यंत त्यांची नेमणूक केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. त्यांना गुणवंत कामगार सेवा संघटनेचे सहकार्य लाभले.

१४०५
कोतोलीत देणगीदारांचा सत्कार
तुरुकवाडी ः कोतोली (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विश्वास ॲग्रो फार्म इंगवलेवाडी यांच्यावतीने ग्रामपंचायतीला ११ हजारांची स्टीलची तिरडी दिल्याबद्दल विश्वास पाटील, प्रतीक पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. सरपंच अशोक कुंभार यांनी स्वागत केले. सुजाता पाटील, उपसरपंच संपत पाटील, बळवंत पाटील, सुजिता य. पाटील, स्वाती केसरकर, लता लोहार, कृष्णा पाटील, लक्ष्मण कर्नाळे, संभाजी पाटील, रंगराव पाटील, दतात्र्य कुंभार, भीमराव कुंभार आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी दीपक गणधर यांनी आभार मानले.

1721
शाहीर नायकवडी यांचा सत्कार
कसबा तारळे ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय स्वातंत्र्याची गौरवगाथा सांगणाऱ्या पोवाड्याची निर्मिती व सादरीकरण केल्याबद्दल येथील सुपुत्र शाहीर विशारद आझाद नायकवडी यांचा मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोतवाल तानाजी पाटील यांनी स्वागत केले. मंडल अधिकारी गीते यांच्या हस्ते नायकवडी यांचा सत्कार झाला. दुर्गमानवडचे माजी सरपंच विष्णू पाटील, तलाठी अजिंक्य पाटील, धर्मा भोगूलकर (तळगाव), शशिकांत भोई, लक्ष्मण गावडे, संदीप पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90013 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..