जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

sakal_logo
By

जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा आजपासून 
कोल्हापूर, ता. २४ : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून (ता. २५) सुरुवात होत आहे. अंबाई डिफेन्स कॉलनी बॅडमिंटन हॉल येथे सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, ५० वर्षे जिल्ह्यात बॅडमिंटन खेळ रुजवणारे असोसिएशन सातत्याने या खेळाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे. अनेक दिग्गज खेळाडू घडवलेल्या या असोसिएशनने अनेक स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. कोरोनानंतर ही मोठी स्पर्धा असून, खेळाडूंसाठी महत्त्वाची आहे. सचिव तन्मय करमरकर यांनी ही स्पर्धा ११, १३, १५ , १७, १९ व खुला गट मुले व मुली तसेच मिश्र दुहेरी, दुहेरी अशा स्वरूपाच्या होणार आहेत. तसेच २७० खेळाडूंनी स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला असल्याचे सांगितले. स्पर्धेसाठी विविध वयोगटानुसार विजेत्यांना फिरता चांदीचा चषक, रोख बक्षीस, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेते खेळाडू राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेचे अंतिम सामने सासने मैदान येथील बॅडमिंटन कोर्ट येथे होणार आहेत. उपाध्यक्ष वर्षा नाडगोंडे, खजानीस चंदू सोहोनी, योगिनी कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90045 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..