गहाळ मोबाईल मालकांना परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गहाळ मोबाईल मालकांना परत
गहाळ मोबाईल मालकांना परत

गहाळ मोबाईल मालकांना परत

sakal_logo
By

४५३८४


गहाळ दीडशे मोबाईलचा शोध
सायबर पोलिसांची विशेष मोहीम; संबंधितांनी मानले आभार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः गहाळ झालेले तब्बल दीडशे मोबाईल शोधून ते मूळ मालकांना सायबर पोलिसांनी परत केले. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याबद्दल संबधितांनी पोलिसांचे आभार मानले.
मोबाईल आज सर्वांच्या गरजेचा भाग आहे. पैशांची तरतूद करून अथवा कर्ज काढून किमती मोबाईल घेतला जातो; पण असा मोबाईल ज्या वेळी गहाळ होतो, तेव्हा तो परत मिळण्याची शक्यता नसते. अशा गहाळ मोबाईलसंबंधीच्या तक्रारींची दखल घेत सायबर पोलिसांनी ते शोधून काढण्याची मोहीम हाती घेतली. तांत्रिक तपास करत राज्यासह कर्नाटकातील विविध पंधरा लाख रुपये किमतीचे दीडशे मोबाईल शोधून काढले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते आज मोबाईल संबंधितांना परत केले. या वर्षातील ही दुसरी यशस्वी मोहीम ठरली. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्माचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

२६७ मोबाईलचा शोध
जूनमध्ये राबविलेल्या मोहीमेत ११ लाखांचे ११७ मोबाईल शोधून संबधितांना परत केले होते. गेल्या तीन महिन्यात २६ लाखांचे एकूण २६७ मोबाईल शोधून संबधितांना परत केले. भविष्यातही सातत्याने ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90089 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..