सॅटर्डे क्लबतर्फे पुरस्कार वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सॅटर्डे क्लबतर्फे पुरस्कार वितरण
सॅटर्डे क्लबतर्फे पुरस्कार वितरण

सॅटर्डे क्लबतर्फे पुरस्कार वितरण

sakal_logo
By

45353

फाऊंड्री व्यवसायात काळानुसार बदल

चंद्रशेखर डोली : सॅटर्डे ट्रस्टतर्फे कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर, ता. २४ : ‘‘फाऊंड्री व्यवसायात काळानुसार बदल केले. कुटुंबीय, कामगारांच्या सहकार्याने उद्योगात यशस्वी स्थान निर्माण केले,’ असे मयुरा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक, उद्योजक चंद्रशेखर डोली यांनी सांगितले. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे ‘कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्कारा’चे वितरण झाले.
श्री. डोली यांना ‘कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्कारा’ने गौरविले. ट्रस्टचे पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे.
तत्पूर्वी, ट्रस्टचे संस्थापक माधवराव भिडे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. नीलेश पाटील यांनी प्रतिज्ञा घेतली. श्री. भिडे यांच्या जीवनावरील चित्रफीत सादर केली. इंद्रनील बंकापुरे यांनी मानपत्राचे वाचन केले. श्री. डोली यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविली. ज्युरी सदस्य कुलदीप कोरगावकर, अमोल चौगले, अमेय गोडे, सुहास पाटील, शैलेश देशपांडे, काशिनाथ गुरव, दीपा देशपांडे, सिद्धेश मोहिते, आशा माळी यांना सन्मानचिन्हाचे वितरण केले.
ीश्री. डोली म्हणाले, ‘‘बेळगावमधून १९७८ ला कोल्हापुरात आलो. उद्योग बनायचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले. उद्योगात बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी क्वालिटीची गरज लागते. डॉ. हावरे म्हणाले, ‘‘उद्योग करायला पैसा लागत नाही, तर वृत्ती लागते. तशी वृत्ती असेल तर तुम्ही उद्योग उभा करू शकता. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. पिराजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. विशाल मंडलिक यांनी एससीजीटी कोल्हापूर रिजनचा आढावा घेतला. सुहास फडणीस यांनी एससीजीटीचा आढावा घेतला. दीपा देशपांडे यांनी डॉ. हावरे यांचा तर मनोज गुणे यांनी ट्रस्टी डॉ. अजित मराठे यांचा परिचय करून दिला. पूनम शहा यांनी आभार मानले. महेंद्र कुलकर्णी यांनी निवेदन केले. रवि डोली, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, विद्यानंद बेडेकर, संजय पेंडसे, दीपक पाटील, प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90098 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..