इचल : आवाडे प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : आवाडे प्रेस
इचल : आवाडे प्रेस

इचल : आवाडे प्रेस

sakal_logo
By

सोयीनुसार गणेश मूर्ती विसर्जन करा
आमदार प्रकाश आवाडे; शहापूर खाणीत मूर्ती विसर्जन करणार नाही
इचलकरंजी, ता. २४ ः मूर्ती दान करा, कृत्रिम जलकुंडात विसर्जन करा अथवा पंचगंगा नदीत विसर्जन करा. आपापल्या सोयीनुसार गणेश मूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन आज आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. पर्यावरणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी काल (मंगळवार) बैठक झाल्यानंतर आज त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीत मांडलेल्या विविध मुद्द्यांचा त्यांनी आढावा घेतला.
आमदार आवाडे म्हणाले, ‘‘शहापूर खाण गटारगंगा बनल्याने आणि पर्यायी व्यवस्था होणे शक्य नाही. त्यामुळे पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनाशिवाय पर्यायच नाही. म्हणून ज्यांना नदीत मूर्ती विसर्जित करावयाची आहे, त्यांनी करावी. त्यामध्ये आडकाठी होणार नाही, जर तसा प्रकार झाल्यास आपण स्वत: त्याठिकाणी जाऊन मार्ग मोकळा करून देऊ.’’
ते म्हणाले, ‘‘सध्याच्या शहापूर खाणीची अवस्था पुराव्यानिशी मंत्र्यांसमोर सादर केली. पंचगंगा नदीपात्रात एसटीपी व सीईटीपी यांच्या माध्यमातून कशाप्रकारे मैलायुक्त व रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळते, या संदर्भातील छायाचित्रण दाखविले. नदीत मूर्ती विसर्जित करण्याचा अट्टहास नाही; पण महापालिकेकेने चांगल्या पाण्याची सोय करावी. गटारगंगा बनलेल्या शहापूर खाणीत मूर्ती विसर्जन करण्यास मान्यता देणार नाही.’’
पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन करू नये, असा न्यायालयाचा लेखी आदेश देण्याची मागणी मुंबईतील बैठकीत केली; पण असा आदेश देण्यास प्रशासन असमर्थ ठरल्याचा दावाही त्यांनी केला. महापालिका प्रशासनाने मूर्ती व निर्माल्य दान संकल्पना राबवून शंभर ठिकाणी कृत्रिम जलकुंड उभारण्यासह जनजागृती करावी, असेही मत मांडले आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक प्रोसेसर्सने फ्लो मीटरसह आरओ प्लॅंट बसविले पाहिजेत. त्यामुळे ५० टक्के सांडपाण्याचा पुनर्वापर केला जाईल. नजीकच्या काळात झेडएलडी प्रोजेक्ट झाला पाहिजे, असा आपण आग्रह धरला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नदी प्रदूषणमुक्तीची भूमिका
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, ही नेहमीच भूमिका राहिली आहे. याबाबतच्या सर्व उपक्रमांत सहभाग राहिला आहे. अशावेळी प्रदूषणाच्या प्रश्नावर कोणीही तोंड उघडले नाही; मात्र गणेशोत्सव आला की त्यांच्यात प्रदूषणाच्या प्रश्नावरून मोठा उत्साह निर्माण होतो, अशी टीकाही आमदार आवाडे यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90104 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..