ich2410.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ich2410.txt
ich2410.txt

ich2410.txt

sakal_logo
By

इचलकरंजी : जलवाहिनी फुटून त्यातून बाहेर पडणारे मासे पकडण्याचा प्रयत्न करताना नागरिक

जलवाहिनी फुटून
बाहेर पडले मासे...
इचलकरंजीत प्रकार; खवय्यांची गर्दी
इचलकरंजी, ता. २४ : येथील गोकुळ चौक परिसरातील जलवाहिनी फुटून त्यातून मासे बाहेर पडल्याने नागरिकांनी मासे पकडण्यासाठी गर्दी केली. याबबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाकीतले काही मासे पाणी वॉशआऊट केले असता त्यातून वाहून गेल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र जलवाहिनीमधून मासे आल्याने या प्रकाराची चर्चा दिवसभर रंगली होती.
जलशुद्धीकरण केंद्रातून वॉशआऊट केलेल्या पाण्याच्या दाबामुळे गोकुळ चौक परिसरातील पाण्याची जलवाहिनी अचानकपणे फुटली. त्यातून पाणी वाया जात असतानाच मासेही बाहेर पडू लागले. जलवाहिनीतून मासे बाहेर पडत असल्याची माहिती समजताच नागरिकांनी चक्क भांडी आणून त्यामध्ये मासे पकडण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. याबाबत माहिती घेतली असता शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नद्यांमधून पाणी उपसा करून त्यावर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. हे पाणी फिल्टर हाऊसमध्येच टाकीत साठवले जाते. पाणी उपसा करताना लहान लहान मासे येतात. ते या टाकीतच राहून मोठे होतात. ते फिल्टरच्या प्रक्रियेत जातच नाहीत. मात्र ही पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी त्यातील पाणी वॉशआऊट केले असता त्यातून मासेही वाहून गेले. पाण्याच्या दाबामुळे जलवाहिनी फुटली आणि त्यातून मासे बाहेर पडल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90110 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..