मराठा समाजास आर्थिक दुर्बल घटकचे दाखले त्वरीत द्यावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा समाजास आर्थिक दुर्बल
घटकचे दाखले त्वरीत द्यावेत
मराठा समाजास आर्थिक दुर्बल घटकचे दाखले त्वरीत द्यावेत

मराठा समाजास आर्थिक दुर्बल घटकचे दाखले त्वरीत द्यावेत

sakal_logo
By

45362
आजरा : नायब तहसीलदार डी. डी. कोळी यांच्याकडे निवेदन देताना मराठा महासंघाचे पदाधिकारी.

मराठा समाजास आर्थिक दुर्बल
घटकचे दाखले त्वरित द्यावेत
मराठा महासंघाची मागणी; आजऱ्यात तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २५ : मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकचे (ईडब्ल्यूएस) दाखले त्वरित मिळावेत, अशी मागणी आजरा तालुका मराठा महासंघातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याच्या तहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार डी. डी. कोळी यांनी निवेदन स्वीकारले.
नवीन वर्षामध्ये विविध शैक्षणिक प्रवेश व नोकरीसाठी आर्थिक दुर्बल घटक दाखले वेळेत मिळणे आवश्यक आहे; परंतु आपल्या अखत्यारीतील तहसील कार्यालयात मराठा समाजातील गरीब घटकांतील मुलांनी आर्थिक दुर्बल घटक दाखल्यांसाठी मागणी अर्ज केले आहेत. त्यांना कोर्टाच्या स्थगितीचा आदेश असल्याचे सांगून मराठा समाजाची मोठी कोंडी होत आहे. मराठा समाजाचे दाखले थांबविण्याविषयी राज्य सरकारचे परिपत्रक आहे का, अशी विचारणा केली असता नाही, असे उत्तर दिले जाते, तर मग मराठा समाजाचे दाखले थांबवण्याचे काय कारण आहे? ही फक्त अडवणूक आहे. मराठा आरक्षण रद्द होण्यापूर्वी एसईबीसीअंतर्गत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस हा पर्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तो निर्णय रद्दबातल करण्याचा निकाल महावितरण निवडी मर्यादित असून सरसकट मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटक दाखले न देण्याचा असा कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या मराठा समजाला कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याने आपोआप आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएसचा लाभ कायद्याने मिळत असूनही मराठ्यांना ईडब्ल्यूएस दाखल्यावाचून वंचित ठेवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. गरीब मराठा विद्यार्थ्यांनाही नाहक अडवणूक न करता तातडीने आर्थिक दुर्बल घटक दाखले द्यावेत अन्यथा संबंधितांना आंदोलन करून जाब विचारला जाईल, असा इशारा देण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष शंकरराव शिंदे, सहसचिव प्रकाश देसाई यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी शिवाजीराव इंजल, विष्णुपंत सुपल, चंद्रकांत पारपोलकर, डॉ. धनाजी राणे, मिनल इंजल, सुनंदा मोरे, तसेच गीता नाईक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90114 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..