पंचगव्य चिकित्सा व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगव्य चिकित्सा व्याख्यान
पंचगव्य चिकित्सा व्याख्यान

पंचगव्य चिकित्सा व्याख्यान

sakal_logo
By

४५४०३

पंचगव्य सेवनामुळे आजारांपासून मुक्ती
डॉ. निरंजनभाई वर्मा; आरोग्यासह पर्यावरणावरही संवाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः पंचगव्य सेवनामुळे अनेक आजारांपासून मुक्ती मिळते, हे विविध प्रयोगांनी सिद्ध झाले असून येत्या काळात पंचगव्य चिकित्सा पद्धतीकडे लोकांचा आणखी कल वाढेल, असा विश्वास आज कांचीपूरम येथील पंचगव्य विद्यापीठाचे गुरूकुलपती सेवारत्न गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजनभाई वर्मा यांनी व्यक्त केला. येथील बाबा रेडीकर गो-गीता सेवा संस्था, पंचगव्य डॉक्टर असोसिएशन, निसर्गमित्र संस्था, गोप्रेमी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.
‘गोमाता, पंचगव्य, आरोग्य आणि पर्यावरण’ या विषयावर संवाद साधताना डॉ. वर्मा यांनी सर्वांगीण आरोग्यासाठी पंचगव्याचा माणसाच्या आरोग्याबरोबरच एकूणच पर्यावरणासाठी किती प्रभावी वापर करता येऊ शकतो, अशा अनुषंगाने संवाद साधला. महाराष्ट्र वन्य जीव पशू महामंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. वनमित्र संस्थेचे अध्यक्ष सतीश शिराळे, धनश्री पाटील, सुनंदा कांबळे, प्रमिला चव्हाण, मंदाकिनी कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90141 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..