सकाळ श्रावणसरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ श्रावणसरी
सकाळ श्रावणसरी

सकाळ श्रावणसरी

sakal_logo
By

४५४०८

चला, ‘सकाळ श्रावणसरी’ आनंदोत्सवाला...!
आज रंगणार सेलिब्रिटींशी गप्पा आणि आकर्षक बक्षिसांची लयलूटही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : श्रावण पर्व सांगतेकडे निघाले असताना आता उद्या (गुरुवारी) ‘सकाळ श्रावणसरी’ हा कार्यक्रम रंगणार आहे. महिलांना पारंपरिक खेळांच्या आनंदोत्सवाबरोबरच सेलिब्रिटींशी गप्पा आणि आकर्षक बक्षिसांची पर्वणीही यानिमित्ताने मिळणार आहे. कमला कॉलेज परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात दुपारी तीनपासून कार्यक्रमाला प्रारंभ होईल. गार्निअर ब्लॅक नॅचरल्स प्रेझेंटस्‌ कार्यक्रमासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ सहप्रायोजक आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.

अशा होतील स्पर्धा
गार्निअर हेल्दी हेअर कॉन्टेस्ट ः
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या नैसर्गिक केसांचा चांगला फोटो व्हॉटस्‌ ॲपवर पाठवावा. एक्स्टेन्शन नसावे. यातून तज्ज्ञ दहा उत्तम स्पर्धकांची निवड करतील. निवडलेल्या स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी स्टेजवर बोलावले जाईल.

‘स्टार प्रवाह’ची सम्राज्ञी स्पर्धा
घर, कुटुंब, करिअर आणि सामाजिक कार्य अशा सर्वच आघाड्यांवर स्त्री एकाच वेळेस लढत असते. आम्ही अशाच एका खास महिलेच्या शोधात आहोत, जी हे सर्वोत्कृष्टपणे कार्य करत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एक आहात, तर या स्पर्धेत सहभागी व्हा. यासाठी तुमचा एक फोटो आणि तुम्हाला का निवडण्यात यावे, याची माहिती सांगणारा परिच्छेद व्हॉटस्‌ ॲपवर पाठवावा. या प्रतिसादातून तज्ज्ञ दहा उत्तम स्पर्धकांची निवड करतील. या निवडलेल्या स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी स्टेजवर बोलावण्यात येईल व तुमची कला अथवा तुमच्याबद्दल काही सादर करण्यासाठी एक मिनिटाचा वेळ देण्यात येईल. स्पर्धेत स्पर्धकांना काही नवनवीन मजेदार खेळ खेळायचे आहेत. सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या वेळीच नावनोंदणी करण्यात येईल.

मराठमोळी फॅशन वॉक स्पर्धा
स्पर्धेत स्पर्धकांना मराठमोळा पारंपरिक साजशृंगार परिधान करून स्टेजवर येऊन रँप वॉक करावा लागेल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या वेळीच नावनोंदणी करण्यात येईल.

उखाणा स्पर्धा
स्पर्धेत स्पर्धकांना उखाणा घ्यायचा असून ‘सकाळ श्रावणसरी’ हा शब्द किंवा यातील कोणतेही एक किंवा दोन शब्द उखाण्यात येणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या वेळीच नावनोंदणी करण्यात येईल. त्याशिवाय माझी सुंदर केशरचना, एक मिनिट गेम शो, हिरवी राणी, पूजा थाळी सजावट, मेकअप सौंदर्या, उपवासाचा फराळ, मेहंदी स्पर्धा आदी स्पर्धा होतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या वेळीच नावनोंदणी करण्यात येईल. दरम्यान, कार्यक्रमातील सर्व स्पर्धा व खेळांसाठी महिलांना प्रवेश विनामूल्य असून अधिक माहिती व स्पर्धेत सहभागासाठी संपर्क ८५९१७३४५१०, ९५५२५८१९१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90148 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..