गणेशोत्सव एसपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव एसपी
गणेशोत्सव एसपी

गणेशोत्सव एसपी

sakal_logo
By

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन
केल्यास मंडळांवर कारवाई
पोलिस अधीक्षक बलकवडे; मिरवणुकीलाही वेळेचे बंधन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः न्यायालयाने ध्वनी मर्यादेबाबत घालून दिलेल्या निर्देशांचे पालन सर्वांना करावेच लागेल. उत्सवात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांकडून शहरातील मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांचे सुरक्षितेबाबत प्रबोधन केले जाणार आहे. मिरजकर तिकटी ते पापाची तिकटी मिरवणूक मार्गावर मंडळानी वेळेच्या मर्यादेचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याची शहरासह जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. मिरवणूक मार्गावर सीसी टीव्ही बसविले असून त्यावरून संपूर्ण मिरवणुकीवर वॉच ठेवला जाणार आहे. बंदोबस्तासाठी १७०० होमगार्डसह बाहेरील जिल्ह्यातून अमलदार, अधिकारी यांची मागणी करण्यात आली आहे. उत्सव काळात प्रत्येक मंडळाला आवाजाच्या मर्यादेचे पालन करावेच लागेल. त्याचा उल्लंघन झाल्यास कारवाई अटळ असले. त्याचबरोबर मिरजकर तिकीट ते पापाची तिकटी येथे मिरवणूक रेंगाळू नये यासाठी मंडळांना वेळेची मर्यादा घालून देण्याचे नियोजन सुरू आहे. त्याचेही मंडळांना पालन करावे लागणार आहे.

प्रभारी अधिकाऱ्यांच्या भेटी
पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी हद्दीतील मंडळांना भेटी देणार आहेत. त्यांना होणाऱ्या गर्दीचे नियोजन, महिलांची सुरक्षितता याबाबत उपाययोजना करण्याबाबत प्रबोधन केले जाणार आहे.

हद्दपारीची प्रक्रिया सुरू
हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ले असे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना उत्सव काळात हद्दपार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांकडून याबाबतचे प्रस्ताव आले आहेत. त्यावर लवकरच कारवाई केली जाईल असे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90156 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..