निपाणी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निपाणी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
निपाणी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

निपाणी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

sakal_logo
By

१८३९०
पूजा तोडकर

निपाणीतील गर्भवतीचा
संशयास्पद मृत्यू
वडिलांनी केली पोलिसांत तक्रार
निपाणी, ता. २४ : येथील न्यू संभाजीनगरातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची फिर्याद वडिलांनी दिली आहे‌. पूजा रोहन तोडकर (वय २८) असे बुधवारी (ता. २४) मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
नऊ महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या पूजा यांना मंगळवारी (ता. २३) रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, बुधवारी (ता. २४) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावल्याने अधिक उपचाराकरिता साखरवाडीतील रुग्णालयात दाखल केले. तेथे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संशयास्पद मृत्यूची फिर्याद वडील संजय भैरू तळस्कर (मूळगाव सेनापती कापशी, सध्या रा. पुणे) यांनी दिली. या प्रकरणी निपाणी शहर पोलिस स्थानकात नोंद करून घेतली. महात्मा गांधी रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तपास शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर करत आहेत. पूजा यांच्या मागे पती, मुलगा, सासू, सासरा असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90159 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..