पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करा; स्वरुप खारगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करा; स्वरुप खारगे
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करा; स्वरुप खारगे

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करा; स्वरुप खारगे

sakal_logo
By

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करा
---
स्वरूप खारगे; पालिकेतर्फे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : शहरातील घरगुती व गणेशोत्सव मंडळांनी यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी केले. शहरातील घरगुती व सार्वजनिक मंडळांसाठी पालिकेतर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्याचेही त्यांनी आवाहन केले.
येथील पालिकेच्या शाहू सभागृहात गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार, पदाधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. गणेशोत्सवात करावयाच्या उपाययोजना व नियोजनाबाबत बैठकीत चर्चा झाली. खारगे म्हणाले, ‘‘गणेशमूर्तीसमोरील आरासमध्ये शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक साहित्यांचा वापर करू नये. त्याऐवजी झाडांचा व कुंड्यांचा वापर करावा. महाप्रसादासाठी प्लास्टिक पत्रावळ्या, वाटी, पेला याचा वापर करू नये. गणेश मंडपाभोवती कचरा होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. मंडपात आग प्रतिबंधात्मक उपाययोजना सज्ज ठेवावी. उच्च न्यायालयाने जाहिरात फलकांबाबत ठरवून दिलेल्या नियमावलींचे सर्व मंडळांनी काटेकोर पालन करावे. पालिकेने निश्‍चित केलेल्या कुंडातच गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जित करून सहकार्य करावे.’’
गणेशोत्सव कालावधीत शहरातील प्रत्येक गल्लीत पोलिस प्रशासन गस्त घालणार असून, सामाजिक शांततेचा भंग होणार नाही, याची जबाबदारी मंडळांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले. मंडपाजवळ रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलिस व्हॅन सहजपणे जाईल असा रस्ता मोकळा ठेवण्याचेही आवाहन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90173 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..