हिडदुगीच्या लक्ष्मी पाटील वीस वर्षांनी झाल्या जटामुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिडदुगीच्या लक्ष्मी पाटील वीस वर्षांनी झाल्या जटामुक्त
हिडदुगीच्या लक्ष्मी पाटील वीस वर्षांनी झाल्या जटामुक्त

हिडदुगीच्या लक्ष्मी पाटील वीस वर्षांनी झाल्या जटामुक्त

sakal_logo
By

45429

हिडदुग्‍गीच्या लक्ष्मी पाटील
वीस वर्षांनी झाल्या जटामुक्त
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : हिडदुग्‍गी (ता. गडहिंग्लज) येथील लक्ष्मीबाई पाटील यांचे जटानिर्मूलन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेत त्यांना २० वर्षांनी जटातून मुक्त केले. विशेष म्हणजे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर या तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या हस्ते प्रथमच जटानिर्मूलन झाले. येथील घाळी महाविद्यालयात हा जटानिर्मूलनाचा कार्यक्रम झाला.
लक्ष्मीबाई पाटील यांनी अंधश्रद्धेतून २० वर्षे जटांचा भार सांभाळला होता. देवीचा कोप होईल या भीतीतून त्यांनी जटा काढल्या नव्हत्या. दरम्यान, राजीव पाटील, आण्णासाहेब देसाई, प्रा. सुभाष कोरे यांनी प्रबोधन करून त्यांच्या मनातील भीती काढून टाकली. येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या सभागृहात राज्यशास्त्र विभागातर्फे झालेल्या कार्यक्रमात त्यांचे जटानिर्मूलन केले. डॉ. शशिकांत संघराज यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुभाष कोरे यांनी जटानिर्मितीमागील कारणे सांगितली. प्रा. तृप्ती हंजी यांच्याहस्ते लक्ष्मी पाटील यांचा साडी देऊन सत्कार झाला. डॉ. सतीश घाळी, अरविंद कित्तूरकर, बाबूराव भोसकी, गजेंद्र बंदी, डॉ. शिवकुमार कोल्हापुरे, किशोर हंजी, महेश घाळी, उदय जोशी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, प्राचार्य विजय चौगुले, उपप्राचार्य अनिता चौगुले, प्रा. प्रकाश भोईटे, पांडुरंग करंबळकर, अशोक मोहिते आदी उपस्थित होते. प्रा. अश्‍विनी पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90191 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..