शरद इन्स्टिट्युटमध्ये आज स्टार्टअप यात्रा आज स्टार्टअप यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद इन्स्टिट्युटमध्ये 
आज स्टार्टअप यात्रा
आज स्टार्टअप यात्रा
शरद इन्स्टिट्युटमध्ये आज स्टार्टअप यात्रा आज स्टार्टअप यात्रा

शरद इन्स्टिट्युटमध्ये आज स्टार्टअप यात्रा आज स्टार्टअप यात्रा

sakal_logo
By

शरद इन्स्टिट्यूटमध्ये
आज स्टार्टअप यात्रा
---
शासनाचा उपक्रम; नवीन संकल्पनेचे सादरीकरण
दानोळी, ता. २५ : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत राज्य शासनाच्या स्टार्टअप यात्रेचे आयोजन उद्या (ता. २६) दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत केले आहे. राज्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरणांतर्गत राज्यभर स्टार्टअप यात्रा सुरू झाली आहे.
शरद इन्स्टिट्यूटमध्ये स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रबोधनासाठी एक फिरते वाहन येणार आहे. या वेळी यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना या वेळी नोंदवू शकतात. कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्‍वत विकास (सस्टेनेबिलिटी) स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन यासह इतर कल्पना सादर करू शकतात.
त्यानंतर जिल्हास्तरावर प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच, नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90227 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..