ई-पिक ॲप नोंदणीत जक्कनहट्टी पहिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पिक ॲप नोंदणीत जक्कनहट्टी पहिले
ई-पिक ॲप नोंदणीत जक्कनहट्टी पहिले

ई-पिक ॲप नोंदणीत जक्कनहट्टी पहिले

sakal_logo
By

45516
कोवाड ः जक्कनहट्टी येथे ई-पीक पाहणीचे काम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
ई-पीक पाहणीत जक्कनहट्टी पहिले
चंदगड तालुक्यात क्रमांक; विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रजिस्टेशनचे काम शंभर टक्के पूर्ण
अशोक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २५ ः जक्कनहट्टी (ता. चंदगड) गावाने विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ई-पीक पाहणीचे काम शंभर टक्के पूर्ण केले. मंडल अधिकारी शरद मगदूम व तलाठी राजश्री पचंडी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातील शेतकऱ्यांचे ई-पीक पाहणीचे काम पूर्ण केल्याने चंदगड तालुक्यात ई-पीक पाहणी पूर्ण करणारे जक्कनहट्टी पहिले गाव ठरले.
संपूर्ण गावाचे ई-पीक पाहणीचे काम पूर्ण झाल्याने प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी विशेष दखल घेऊन त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ई-पीक पाहणीचा शासनाचा पथदर्शी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महसूल विभागातर्फे गावोगावी प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचे मार्गदर्शन केले जात आहे. मोबाईलच्या साहाय्याने ही नोंद केली जात असल्याने अनेक ठिकाणी मोबाईलसह नेटवर्कची अडचण भासत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे येत आहेत. तरीही त्यातून मार्ग काढण्यासाठी कोवाड मंडल कार्यालयातील तलाठी राजश्री पचंडी व मंडल अधिकारी शरद मगदूम यांनी जक्कनहट्टी येथील काही विद्यार्थ्यांना ई-पीक पाहणी रजिस्टेशनची माहिती करून देऊन गावातील शेतकऱ्यांच्या ई-पीक पाहणी नोंदीसाठी मार्गदर्शन केले. या कामासाठी विद्यार्थ्यांचे गट करून नियोजन करून दिले. संबंधित विद्यार्थ्यांनी सामाजिक काम समजून गेल्या आठ दिवसांपासून शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटलेनंतर तसेच सुटीच्या दिवशी ई-पीक पाहणीचे काम करून शेतकऱ्यांच्या पीक पाण्याची नोंद करून दिली आहे. शेतकऱ्यांनी शेतात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आपल्या शेताची माहिती करून दिली. त्यामुळे संपूर्ण गावाचे रजिस्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. रजिस्टेशनचे काम पूर्ण झालेनंतर अनेक शेतकऱ्यांनी तलाठी पचंडी यांच्याकडे जाऊन माहितीची खातरजमाही करून घेतली. मनीषा भावकू पाटील, श्वेता जक्कापा पाटील, प्रज्ञा मारुती पाटील, नरसू पुंडिलक वर्पे, संतोष पुंडलिक पाटील, दीपक विठोबा बुच्चे आदी विद्यार्थ्यांनी केलेले हे काम कौतुकाचे असल्याने प्रांताधिकारी वाघमोडे, तहसीलदार विनोद रणवरे यांनी संबंधित विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांचाही प्रोत्साहन प्रशस्‍तिपत्र देऊन त्यांचा गौरव गेला.
-------------
जक्कनहट्टी पॅटर्न...
जक्कनहट्टी गावाने विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ई-पीक पाहणी रजिस्टेशनचे काम शंभर टक्के पूर्ण केले आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण तालुक्याने जक्कनहट्टी पॅटर्न राबवून ई-पीक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प पूर्णत्वाला न्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90264 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..