इचलकरंजीत मार्क्सवादी पक्षाचा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत मार्क्सवादी पक्षाचा मोर्चा
इचलकरंजीत मार्क्सवादी पक्षाचा मोर्चा

इचलकरंजीत मार्क्सवादी पक्षाचा मोर्चा

sakal_logo
By

45517
इचलकरंजी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रांत कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा.

इचलकरंजीत ‘मार्क्सवादी’चा मोर्चा
---
विविध मागण्या; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर
इचलकरंजी, ता. २५ : पुरवठा कार्यालय सक्षमपणे सुरू ठेवावे, रेशनवरील धान्य नियमित मिळावे तसेच मोफत मिळणारे धान्य कायमपणे सुरू राहावे, पूरग्रस्तांचे प्रश्‍न तातडीने सोडवावेत यासह अन्य मागण्यांसाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘रेशन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव’ यासह घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर व पुरवठा अधिकारी अमित डोंगरे यांना देण्यात आले.
रेशन व्यवस्था कायमस्वरूपी सुरू राहावी, माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मिळावे, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करावा, पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे, बांधकाम कामगारांच्या नोंदणी अर्जात त्रुटी काढून लाभापासून वंचित ठेवले जात आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, खाद्यतेलाची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात माकपच्या कार्यालयापासून करण्यात आली होती. मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता. केंद्र सरकारने मोफत धान्याची मुदत वाढवूनही एप्रिलपासून रेशनवरील धान्य नियमित मिळत नाही. अनेक गरजूंना लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीत सरकारने अन्नधान्यावर जीएसटी लागू केल्याने प्रचंड महागाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जगणे मुश्कील झाले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, मार्क्सवादी पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याने शिरस्तेदार संजय काटकर यांनी पुरवठा अधिकारी डोंगरे यांना बोलावून घेतले. मोर्चात दत्ता माने, जीवन कोळी, धनाजी जाधव, सुभाष कांबळे, पार्वती जाधव, पार्वती म्हेत्रे, भाऊसो कसबे, प्रकाश कारके, नूरमहंमद बेळकुडे, सदा मलाबादे, भरमा कांबळे, गोपाळ पोला, कुमार कागले यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90266 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..