गणेशोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव
गणेशोत्सव

गणेशोत्सव

sakal_logo
By

मंडळांना विशेष गणराया ॲवॉर्ड
महिलां सहभागासह पारंपरिक वाद्याची अट

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः पारंपरिक वाद्ये, महिलांचा सहभाग आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढणाऱ्या मंडळाला यंदा विशेष गणराया ॲवॉर्ड देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत शहर परिसरातील मंडळांना सहभागाची संधी आहे. स्पर्धेत शहरातील मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. गणेशोत्सवात प्रबोधनात्मक संदेश, शिस्तबद्धता, पारंपरिक वाद्ये आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करणाऱ्या मंडळांना जिल्हा पोलिस दलातर्फे गणराया ॲवॉर्ड दिला जातो. कोरोनामुळे दोन वर्षे ही स्पर्धा झाली नव्हती. मात्र यंदा ही स्पर्धा होणार आहे. गणेशोत्सवात अलीकडे महिलांचा सहभाग वाढत आहे. मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबचा तीन वर्षांपूर्वी गणेशोत्सव महिलांनीच पुढाकार घेऊन साजरा केला होता. अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्ये, शिस्तबद्धता आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून मिरवणूक काढण्याची पंरपरा जपली आहे. महिलांचा सहभाग आणखी वाढावा आणि शिस्तबद्ध आणि प्रबोधनात्मक संदेशाच्या मिरवणुका निघाव्यात या उद्देशाने ही स्पर्धा होणार आहे. जिल्हा पोलिस दलातर्फे मिरवणुकीचे परीक्षण करून विजेत्या मंडळाची निवड केली जाईल.
------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90283 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..