१ लाख पुरग्रस्त स्थलांतरीत होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१ लाख पुरग्रस्त स्थलांतरीत होणार
१ लाख पुरग्रस्त स्थलांतरीत होणार

१ लाख पुरग्रस्त स्थलांतरीत होणार

sakal_logo
By

45624

पूरग्रस्त ४३ गावांसाठी निवारा केंद्र
जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव; शिरोळमधील सहा गावांत होणार १ लाख पूरग्रस्तांची सोय
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे शिरोळ तालुक्‍यातील ५३ पैकी ४३ गावे बाधित होतात. या गावांतील ३७ हजार ७४० कुटुंबांना ६ गावांतील शासकीय जमिनीवर तात्पुरत्‍या निवारा केंद्रासाठी ३३७ एकर जमिनीचा प्रस्ताव तयार केला आहे. जमिनीवर पूरस्थितीत दर्जेदार निवारा केंद्र उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे शिरोळमधील १ लाख १० हजार ६१० पूरग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. निवारा केंद्र तात्पुरत्या स्वरूपाचे उभारले जाणार आहे. पुरानंतर हे निवारा केंद्र व्यावसायिक पद्धतीने वापले जाणार आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे आणि पंचगंगा, वारणा, कृष्णा आणि दूधगंगा नदीच्या पुरामुळे शिरोळला बेटाचे स्वरूप येते. तालुक्‍यातील ३७ हजार ७४० कुटुंबे पूरबाधित झाली आहेत. त्या कुटुंबाना तात्पुरता आणि सुरक्षित निवारा देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. शिरोळ तालुक्‍यात २०१९ मध्ये ४३ गावे पाण्याखाली होती. १८६६१ कुटुंबांचे स्थलांतर करायचे कुठे असा प्रश्‍न होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ ऑगस्टला आढावा बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेतला. शिरोळसाठी तत्काळ निवारा केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव मागितला. त्यानुसार जिल्हा प्रशासनानेही प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे.
निवारा केंद्रात स्थलांतरी होणारी गावे, कुटुंब संख्या, लोकसंख्या आणि मिळणारे क्षेत्र असे भरगच्च नियोजन केले आहे. यामध्ये, धरणगुत्तीतील निवारा केंद्रात धरणगुत्ती, शिरोळ, शिरटी, घालवाड, अर्जुनवाड, चिंचवाड, उदगाव, कुटवाड, हसूर, कनवाडमधील ७३१९ कुटुंबातील ३२ हजार २११ लोकांची सोय केली जाणार आहे. नांदणी येथील केंद्रात नांदणी, टाकवडे, शिरढोण, नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, बुबनाळ, आलास, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी गावातील ६५३३ कुटुंबांतील ३२४९९ लोकांसाठी १३.९ हेक्‍टर जमिनीवर निवारा केंद्र होईल. तेरवाड येथील केंद्रात तेरवाड, हेरवाड आणि कुरुंदवाडमधील २१४५ कुटुंबातील ९०९८ लोकांना २६.७८ हेक्‍टर जमीन दिली जाईल. टाकळीवाडी येथे घोसरवाड, दत्तवाड, नवे दत्तवाड, जुने दत्तववाड, टाकळी, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, अकिवाट, बस्तवाड व मजरेवाडा येथील ६१८४ कुटुंबातील २६४६३ लोकांना १६.३१ हेक्‍टर क्षेत्रावर विस्थापित केले जाणार आहे. अब्दुललाट व शिरदवाड येथील ४४० कुटुंबातील १२४० लोकांना ४.४७ व जैनापूर येथे कवठेसार, दानोळी, कोथळी व उमळवाडी २९७१ कुटुंबाना ३२ हेक्‍ट जमिनीचे नियोजन दिले आहे.

कोट
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्‍यातील पूरबाधित गावातील नागरिकांना ६ गावांमध्ये शासकीय जमिनीमध्ये निवारागृह उभारण्यासाठी मान्यता मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे.
- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90295 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..