पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

३७६४

जयसिंगपुरात १३ व्या गल्लीतील
रस्त्यातील अतिक्रमण हटविले
जयसिंगपूर : शहरातील शिवाजी हौसिंग सोसायटीमध्ये तेराव्या गल्लीतून दसरा चौक स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण आज पालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केले.या प्रकरणी जीवन पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. १३ वी गल्ली ते दसरा चौक स्टेडियमकडे जाणारा मार्गावर सिमेंट कट्टे, घरांचे बांधकामे केले होते. सामाजिक कार्यकर्ते जीवन पाटील यांनी रस्ता खुला करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांनी अतिक्रमण हटवण्याचे आश्‍वासन दिले होते. उपमुख्याधिकारी वनखंडे यांच्यासह अधिकार्‍यांनी पाहणी केली होती. आज पालिकेचे पथक जेसीबीसह दाखल झाले. मालू हायस्कूलपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. कट्टे, लोखंडी जाळ्या, भिंती जेसीबीने जमीनदोस्त केल्या. यहाय्यक नगररचना अधिकारी मारुती जाधव, जीवन सरडे, नगर अभियंता मुबीन नदाफ, एस. यु. पठाण, रामचंद्र कुंभार, आरोग्य अधिकारी संदीप कांबळे, प्रमोद जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

अत्याचारप्रकरणी तरुणास कोठडी
शिरोळ ः लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी येथील संशयित सागर संभाजी कदम (वय ३६, सध्या रा. माने गल्ली, शिरोळ, मूळ अर्जुनवाड) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने कदम याला पाच दिवस पोलिस कोठडी दिली. याबाबत पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे, लग्नाचे आमिष दाखवून डिसेंबर २०१० ते २५ एप्रिल २०२२ दरम्यान वेळोवेळी जयसिंगपूर, शिरोळ येथे अत्याचार केले. पोलिसांनी कदम याला अटक करून जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डी. डी. सानप तपास करीत आहेत.

पत्नी, मेहुणीने केली धक्काबुक्की
इचलकरंजी : पतीला धक्काबुक्की केल्याप्रकरणी पत्नी रसिका अभिषेक पाटील व मेहुणी श्रद्धा स्वप्निल चौगुले यांच्यावर गावभाग पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी अभिषेक आदगोंडा पाटील (गुलमोहर कॉलनी, सांगली नाका) यांनी फिर्याद दिली. अभिषेक व रसिका यांच्यात कौटुंबिक न्यायालयात वाद आहे. १८ ऑगस्टला सुनावणी दरम्यान अभिषेक त्यांच्या मुलास खाऊ देण्यासाठी घेऊन गेले होते. ते परत आल्यावर उशीर का केला असे म्हणत पत्नी रसिका आणि मेहुणी श्रद्धा यांनी अभिषेक यास धक्काबुक्की केली. याप्रकरणी अभिषेक पाटील यांच्या फिर्यादीनुसार दोघींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

एसटीतून वृद्धेचे सोन्याचे गंठण पळवले
आजरा ः आजरा - चंदगड एसटीतून रुक्मिणी विठोबा राणे (वय ७१, रा. भावेवाडी ता. आजरा) यांचे सोन्याचे गंठण पळविले. ही घटना शुक्रवार (ता. १९) सायंकाळी चार वाजता घडली आहे. गंठण अडीच तोळ्याचे असून याची किंमत ७२ हजार रुपये इतकी आहे. चोरट्याविरोधात आजरा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आजरा येथून बाजार आटोपून त्या आजरा-चंदगड एसटीतून गावी परतत होत्या. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने गंठण पळविले. अमलदार संतोष घस्ती अधिक तपास करीत आहेत.

शासकीय इमारतीत धार्मिक कार्यक्रम रद्द करा
कोल्हापूर ः शासकीय कार्यालयात धार्मिक कार्यक्रम करू नये असे निर्देश यापूर्वी शासनाने दिले आहेत. त्याचे पालन करावे आणि होणारे कार्यक्रम रद्द करावेत अशी मागणी संविधान समर्थक कृती समितीने केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिले. या निवेदनावर सतिशचंद्र कांबळे, सीमा पाटील, अनिल चव्हाण, दिलदार मुजावर, सिद्धार्थ कांबळे, अशोक चौगुले, ॲड. चारुलता चव्हाण आदींच्या स्वाक्षरी आहेत.

गळफास घेतलेल्यांचा मृत्यू
कोल्हापूर ः राजेंद्रनगर येथील राहत्या घरा गळफास घेतलेल्या व्यक्तीचा सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हाजीबाबा मलकाप्पा बनसोडे (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90326 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..