आजऱ्यातील शेतकऱ्यांनी साधला संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यातील शेतकऱ्यांनी साधला संवाद
आजऱ्यातील शेतकऱ्यांनी साधला संवाद

आजऱ्यातील शेतकऱ्यांनी साधला संवाद

sakal_logo
By

45565
कसबा डिग्रज (सांगली) : येथे हळदीच्या पिकाची माहिती घेताना आजऱ्यातील शेतकरी.

आजऱ्यातील शेतकऱ्यांनी साधला संवाद
---
कसबे डिग्रज हळद संशोधन केंद्राला भेट; लागवडीबरोबर बाजारपेठेची घेतली माहिती
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २८ : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील हळद संशोधन केंद्राला भेट दिली. या केंद्रांतर्गत विकसित केलेले हळद लागवड तंत्रज्ञान, बियाणे, प्रक्रिया यासह बाजारपेठेची माहिती या वेळी शेतकऱ्यांनी घेतली. प्रभारी अधिकारी व शास्त्रज्ञ डॉ. मनोज माळी यांच्याशी संवाद साधला.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राज्यांतर्गत हा शेतकरी अभ्यास दौरा झाला. या दौऱ्यात तालुक्यातील विविध गावांतील हळद उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
‘आत्मा’चे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अमित यमगेकर यांनी स्वागत केले. या वेळी प्रा. डॉ. मनोज माळी यांनी हळदीविषयी चलचित्रफितद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बियाणे निवड, बीज प्रक्रिया, हळद लागवडची पद्धत (गादी वाफा, बरंबा पद्धत) याची त्यांनी माहिती दिली. कंद माशी, खोड किडा, हुमणी, सूत्रकृमी या विविध किडी, कंद कुज, करपा रोग या विषयी शेतकऱ्यांना दक्ष राहण्याची सूचना केली. काढणी व्यवस्थापन, काढणीपश्‍चात प्रक्रिया याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी बाजारपेठ अभ्यासाबाबत प्राथमिक माहिती घेतली. हळद पिकाच्या राजापुरी, फुले स्वरूपा, कृष्णा, सेलम, प्रगती या जातींची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. दरम्यान, हळद संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन शेतकऱ्यांनी हळद पिकाची पाहणी केली. या वेळी झालेल्या चर्चेत जयसिंग नार्वेकर, सूर्यकांत दोरुगडे, प्रकाश रावण, मुकुंद नार्वेकर, सयाजी देसाई, सतीश कांबळे, शंकर पाटील, अमृत किल्लेदार, संजय चौगले, निवृत्ती कांबळे, मारुती केसरकर यांनी सहभाग घेतला. प्रगतिशील शेतकरी सूर्यकांत दोरुगडे, निवृत्ती कांबळे, रणजित कालेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

चौकट
कुरकुमीनमुळे हळदीला पिवळा रंग
कुरकुमीन या रंगद्रव्यामुळे हळदीला पिवळा रंग प्राप्त होतो. या रंगद्रव्याची टक्केवारी अधिक असल्यास थोडा गर्द पिवळा रंग प्राप्त होत असतो. एक टक्का ते सात टक्क्यांपर्यंत हळदीत कुरकुमीनचे प्रमाण असते. त्यानुसार जातीची निवड करावी, अशी सूचना डॉ. माळी यांनी शेतकऱ्यांना केली.

हळद उत्पादक कंपनी स्थापन करणार
वन्य प्राण्यांमुळे जंगलालगतची जमीन पडिक आहे. येथे पर्यायी पीक म्हणून हळद लागवड केली जाईल. यासाठी तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे गट स्थापन केले जाणार आहेत, असे यमगेकर यांनी सांगितले.

अपंग शेतकऱ्यांचा सहभाग
या सहलीत तालुक्यातील अपंग शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी हळद लागवडीच्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तालुक्यात प्रथमच शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यात अपंग शेतकरी सहभागी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90329 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..