उत्कृष्ट काम करणाऱ्या माजी सैनिकांना विशेष पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्कृष्ट काम करणाऱ्या माजी सैनिकांना विशेष पुरस्कार
उत्कृष्ट काम करणाऱ्या माजी सैनिकांना विशेष पुरस्कार

उत्कृष्ट काम करणाऱ्या माजी सैनिकांना विशेष पुरस्कार

sakal_logo
By

माजी सैनिकांसह पाल्यांना आवाहन
कोल्हापूर, ता. २५ : विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या माजी सैनिक, विधवा, पाल्य यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यासाठी माजी सैनिकांनी संबंधित कार्याबद्दलची प्रमाणपत्रे, गुणपत्रे, सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्रासह १२ सप्टेंबरपूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज करावेत,
असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा ज्यांनी गतवर्षी विविध क्षेत्रांत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य,संगीत, गायन, नृत्य, वादन क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा, अपघात इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, दहावी, बारावीत ९० टक्केपेक्षा जास्त गूण मिळवून उत्तीर्ण माजी सैनिक, विधवांचे पाल्य, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षात विद्यापीठात प्रथम आलेल्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल धनराशी, पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90349 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..