बचत गटांकडून १६ हजार ध्‍वजांची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटांकडून १६ हजार ध्‍वजांची विक्री
बचत गटांकडून १६ हजार ध्‍वजांची विक्री

बचत गटांकडून १६ हजार ध्‍वजांची विक्री

sakal_logo
By

बचत गटांकडून
१६ हजार ध्‍वज विक्री
कोल्‍हापूर, ता. २५ : हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा परिषदने पंचायत समित्यांमार्फत मोहीम राबविली. तिरंगा विक्रीची विशेष जबाबदारी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाकडील क्रांती महिला प्रभाग संघ गडमुडशिंगी (ता. करवीर) यांच्याकडे सोपविली होती. या गटाने तब्‍बल १६ हजार राष्ट्रध्वजांची विक्री केली. यातून महिला प्रभाग संघासही लाभ झाला.
प्रभाग संघाने केवळ ध्‍वजांची विक्री न करता राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि फडकवण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. स्टॉल उभारणी व विक्री नियोजनासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक वनिता डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांना माफक दरात तिरंगा उपलब्ध व्हावा याकरिता जिल्हा परिषद आवारात तिरंगा विक्री करणेसाठी विशेष स्टॉलची उभारणी करणेत आली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रकल्‍प संचालक डॉ. रवि शिवदास यांचे हस्ते स्‍टॉलचे उद्‌घाटन केले होते. अजूनही हा स्‍टॉल सुरूच ठेवला असून या ठिकाणी आता पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीसाठी दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90357 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..