कृती समिती आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृती समिती आंदोलन
कृती समिती आंदोलन

कृती समिती आंदोलन

sakal_logo
By

कृती समिती ठिय्या
आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर, ता. २५ ः शिरोली टोल नाक्यासमोरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे महापालिकेने न काढल्याने रस्ता बंद झाला आहे. मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने गनिमी काव्याने प्रशासकांच्या दालनाच्या दरवाजात अथवा मोटारीसमोर कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती ठिय्या आंदोलन करणार आहे. याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनला निवेदन दिले आहे.
त्या रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. स्थानिक रहिवाशांना त्रास होत आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दोन वर्षे निवेदने देऊन अतिक्रमणे काढण्याबाबत वारंवार पाठपुरावा करत आहे. पण, कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्याचा निषेध आणि प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने महापालिका कार्यालयातील दालनाच्या दरवाजात किंवा मोटारीसमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत असे पत्र अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके यांनी दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90408 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..