गड- पॉलिटेक्नि प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड- पॉलिटेक्नि प्रवेश
गड- पॉलिटेक्नि प्रवेश

गड- पॉलिटेक्नि प्रवेश

sakal_logo
By

यंदा पॉलिटेक्निकचे मेरीट वाढले
पहिली यादी जाहीर; प्रवेशासाठी सोमवार अखेर मुदत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : उत्सुकता लागून राहिलेली पदविका आभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) पहिली यादी आज सायंकाळी जाहीर झाली. दरवर्षीच्या तुलनेत सरासरी ५ ते १० टक्‍क्यांनी मेरिट वाढले आहे. यादीतील विद्यार्थ्यांना सोमवार (ता. २९) अखेर प्रवेश निश्चित करायचा आहे. बुधवारी (ता. ३१) दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. सहा सप्टेंबरला दुसरी यादी लागणार आहे. प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ही प्रवेशप्रकिया सुरू आहे.
या वर्षी २ जूनला पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. तब्बल दोन महिने ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. अकरावीची प्रवेश प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने पालकांत पॉलिटेक्निक प्रवेशाची चिंता होती. त्यातच यंदा प्रवेशासाठी अर्जाचा पाऊसच पडला. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे आठ हजार प्रवेश अर्ज आले आहेत. त्यामुळे पहिल्या यादीबद्दल पालक, विद्यार्थ्यांत कमालीची उत्कंठा होती. अपेक्षेप्रमाणे मेरिटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील शासकीय, अनुदानित संस्थात तर नव्वदच्या पुढेच खुल्या गटाचा प्रवेश बंद झाला आहे. खासगी संस्थातही सुमारे ८० टक्‍क्यांपेक्षा अधिक गुणांना प्रवेश मिळाला आहे.
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगइन आयडीतून http://poly२२.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जागा स्वीकारून संबंधित संस्थेत जाऊन हजेरी द्यावयची आहे. मुळ दाखले, गुणपत्रिका आणि शुल्क जमा करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. मेरिट वाढल्याने अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत स्थान मिळालेले नाही. बुधवारी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर होईल. त्यासाठी विकल्प भरण्याची प्रक्रिया १ ते ४ सप्टेंबर अखेर असून ६ सप्टेंबरला दुसरी यादी लागेल.


कॉम्‍प्‍युटर, इलेक्ट्रिकला मागणी
पहिल्या फेरीत कॉम्‍प्‍युटर, इलेक्ट्रीकलला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. खासकरून कॉम्‍प्‍युटरच्या अधिक मागणीमुळे खुल्या गटाचा नव्वदच्या टक्क्यालाच प्रवेश बंद होण्याची शक्यता आहे. पाठोपाठ इलेक्ट्रॉनिक्स, सिव्‍हिल, मॅकेनिकल अशा अभ्यासक्रमांचा पर्याय विद्यार्थ्यांनी निवडला असल्याचे दिसते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90440 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..