इचल: पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: पोलिस वृत्त
इचल: पोलिस वृत्त

इचल: पोलिस वृत्त

sakal_logo
By

खोतवाडीत दांपत्यास
लाथा-बुक्क्यांनी मारहाण
चौघांवर गुन्हा; मित्रासोबत फिरल्याचा राग
इचलकरंजी, ता. २५ : मित्रासोबत फिरल्याचा रागातून दांपत्यास लाथाबुक्याने व लाकडी माऱ्याने मारून जखमी केले. याप्रकरणी अक्षय गौरजी, वैभव पुजारी, अरबाज मुल्ला (खोतवाडी) व विनायक चौगुले (तारदाळ) यांच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोहित प्रभाकर माळी (शिंदे मळा, खोतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी, संशयितांनी माळी यांना खोतवाडी येथे तू अंबादास कुंभार यांच्यासोबत फिरू नकोस व त्याच्या भांडणात पडू
नकोस नाही तर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली होती. बुधवारी माळी हे अंबादास कुंभार याच्यासोबत फिरताना दिसले. हा राग मनात धरून माळी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. माळी यांची पत्नी नेहा भांडण सोडविण्यास गेली असता तिलाही संशयितांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. भांडण सुरू असताना संशयित आरोपी अक्षय व वैभव यांनी हातातील मागाचे माऱ्याने माळी यांच्या डोक्यात मारले व अरबाजनेदेखील स्टीलच्या कड्याने मारहाण केली. माळी यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान माळी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कल्पना न देता पोलिस ठाण्यात येऊन संशयितांविरोधात फिर्याद दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90443 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..