गुंठेवारीसाठी नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंठेवारीसाठी नियोजन
गुंठेवारीसाठी नियोजन

गुंठेवारीसाठी नियोजन

sakal_logo
By

गुंठेवारी नियमितीकरणासाठी
स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती

कोल्हापूर, ता. २५ : गुंठेवारी विकासाचे नियमितीकरणासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. सहा महिन्यात प्रस्ताव सादर करायचे असल्याने आता २०५ अर्जांची विक्री झाली आहे.
या अधिकाऱ्यांकडून दैनंदिन कामकाज पाहून गुंठेवारी नियमितीकरण मागणी अर्जांचे संकलन करणे, अर्जांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर यांच्याकडे गुंठेवारी नियमितीकरणासाठी दाखल होणाऱ्या अर्जाची कागदपत्रांची तपासणी करणे, तपासणीनंतर प्रस्ताव सादर करणे, वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार गुंठेवारी संबंधाने कामकाज पाहणे अशी कामे आहेत. कनिष्ठ अभियंता श्रद्धा बेडेकर यांनी दाखल झालेल्या अर्जाचे संकलन करणे, अर्ज स्वीकारणे, त्याची पोहोच देणे, रजिस्टरमध्ये नोंदी ठेवण्याची कामे करायची आहेत. आरेखक खुशालचंदे राजमाने व कनिष्ठ लिपीक अक्षय गोदमुले यांनी गुंठेवारी संबंधाने दाखल झालेल्या फाईल्स रजिस्टरमध्ये नमूद करून रेकॉर्डमध्ये स्वतंत्र ठेवायच्या आहेत. सचिन पन्हाळकर यांनी दाखल होणाऱ्या अर्जाचे संगणकीय चलन काढणे, त्याचे आदेश तयार करायचे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90450 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..